आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड शहरात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असलेल्या प्रतिभा महाविद्यालयाला शासन पातळीवर प्रसंगी सहकार्य करणार: आमदार उमा खापरे

पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात बेटी पढाओ, बेटी बचाओ, मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे स्त्रीभ्रृण हत्याचे प्रमाण कमी झाले आहे ||

Spread the love

पिंपरी चिंचवड शहरात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असलेल्या प्रतिभा महाविद्यालयाला शासन पातळीवर प्रसंगी सहकार्य करणार: नवनिर्वाचित आमदार उमा खापरे

आवाज न्यूज:चिंचवड प्रतिनिधी  चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा गु्रप ऑफ इन्स्टिट्युटमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील प्रथम महिला विधानपरिषदेवर निवडून आलेल्या उमा खापरे, अजित वाडीकर दिग्दर्शित स्त्रीभ्रृण हत्येबद्दल तसेच, समाजातील वास्तव्याचे दर्शन घडविणार्‍या ‘वाय’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यातील मुख्य अभिनेत्री मुक्ता बर्वे, सहअभिनेता ओंकार गोवर्धन, (आई कुठे काय करते या मालिकेतील आशुतोष केळकर) अभिनेत्री प्राजक्ता माळी, रोहित कोकाटे, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका तसेच, बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेची जनजागृती करणार्‍या संगीता तरडे यांचा सत्कार प्रतिभा महाविद्यालयातील प्रांगणात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ व गणरायाची सुबक मूर्ती असलेले स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्यप्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. जयश्री मुळे समवेत प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नुकताच प्रदर्शित झालेला ‘वाय’ या मराठी चित्रपटाचे टे्लर उपस्थितांना दाखविण्यात आला.

आमदार उमा खापरे पुढे म्हणाल्या, संस्थेचे संस्थापक दीपक शहा हे लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजपयोगी गेली अनेक वर्षे उपक्रमे राबवित आहे. त्यांच्या बरोबर माझे सलोख्याचे संबंध असून ते आज पिंपरी चिंचवड शहरात शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कामगिरी त्याच्या सहकार्यांसमवेत करीत आहे हे अभिमानास्पद आहे. प्रतिभा महाविद्यालय या शहरात नावारुपाला आले असून प्रसंगी शासकिय पातळीवर गरज भासल्यास मदत करू असे आश्वासन यावेळी दिले. त्यापुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात बेटी पढाओ, बेटी बचाओ, मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे स्त्रीभ्रृण हत्याचे प्रमाण कमी झाले असून, आता मुलीचा जन्मदर ही सरासरी वाढत आहे. सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना सिनेअभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाल्या, मी पिंपरी चिंचवडचीच रहिवासी असून या शहरात मी लहानाची मोठी झाली. शहरात झालेल्या माझ्या सत्कारामुळे मी आज भारावून गेले आहे व आज मला अभिमान देखील वाटत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी प्रदर्शित झालेला वाय चित्रपट सिनेमागृहात प्रत्येकाने आवर्जुन पहावा, यात ज्वलंत सामाजिक विषय प्रत्येकाला आवडेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, भविष्याचा विचार करा. चांगली दिशा मिळाली की जीवनाला कलाटणी मिळते. यावेळी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, ओंकार गोवर्धन, संगीता तरडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गीता कांबळे यांनी तर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!