आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अपघाताला निमंत्रित करणाऱ्या, भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप समोर पडलेल्या खड्ड्याची नगरपरिषदेने त्वरित डागडुजी करावी.पंकज ओसवाल

Spread the love

अपघाताला निमंत्रित करणाऱ्या, भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप समोर पडलेल्या खड्ड्याची नगरपरिषदेने त्वरित डागडुजी करावी.पंकज ओसवाल

भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप समोर ,पडलेल्या खड्ड्याची नगरपालिकेला तक्रार केली असता दोन दिवसापूर्वी तो खड्डा भरण्यात आला, परंतु तो व्यवस्थित न भरल्यामुळे कालच्या झालेल्या पावसात पुन्हा खड्डा अस्तित्वात आला त्यामुळे त्याच्यामध्ये  काल रात्री पाऊस पडत असताना, पाच ते सहा टू व्हीलर वाले त्याच्यात पडले, तरी त्या खड्ड्याला व्यवस्थित रित्या भराव टाकून बुजविण्यात यावा.

 काल रात्री  पाऊस चालू होता साडेआठ ते नऊच्या दरम्यान तेव्हा या खड्ड्यात न कमीत कमी पाच ते सहा टू व्हीलर पडता पडता वाचले आणि नंतर काही दुकानदारांनी टू व्हीलर वाल्यांना सांगितले की इकडं जाऊ नका इथे मोठे, खड्डा आहे तेव्हा काही लोकांनी समजून घेतलं 

कृपया हा खड्डा लवकरात लवकर पूर्ण भरावा अपघात होण्याच्या अगोदर भंडारी हॉस्पिटल समोर आणि हा खड्ड्याजवळ बस स्टॉप आहे वडगाव ला जाणारी बस येते थांबत आहे, पावसाचं पाणी वाहत असताना हा खड्डा दिसत नाही. तरी त्या खड्ड्याला व्यवस्थित रित्या भराव टाकून बुजविण्यात यावा अशी विनंती तळेगाव येथील व्यापारी पंकज ओसवाल यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!