महाराष्ट्र

महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल स्वस्त होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Spread the love

बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल स्वस्त होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

 आवाज न्यूज: मुंबई  प्रतिनिधी ४  जुुुलै २०२२ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

दरम्यान या अभिनंदनानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये आपल्या बंडाचं कारण स्पष्ट करणारं भाषण देतानाच काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

१. पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल – डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार.

२. हिरकणीने रायगड वाचवला आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतो.

३. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!