आरोग्य व शिक्षण

पंतप्रधानांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; तळेगाव शहर भाजपची निवेदनाद्वारे मागणी

Spread the love

तळेगाव : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अपमानजनक असे बेताल वक्तव्य करुन संपूर्ण देशवासियांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पक्ष तळेगाव शहराच्या वतीने करण्यात आली.

या संदर्भातील आग्रही मागणी प्रभारी पोलीस निरिक्षक साळी साहेब यांच्याकडे करण्यात आली.याविषयात लीगल ओपिनियन घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे वादग्रस्त विधान करणार्या नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,नगरसेविका शोभाताई भेगडे ,सरचिटणीस रविंद्र साबळे, विनायक भेगडे,भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, सहकार आघाडी अध्यक्ष संतोषभाऊ परदेशी,भाजयुमो माजी अध्यक्ष अरुणभाऊ भेगडे,सोशल मिडीया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरचिटणीस विष्णू नाना गुंजाळ,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष ऋषीकेश सुतार,ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!