आरोग्य व शिक्षण

अनेक वर्षापासून रखडलेला रस्ता मार्गी लागून औद्योगिक वसाहत ते डोंगरगाव केवरेला जोडणार – माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे

Spread the love

लोणावळा : अनेक वर्षापासून रखडलेला रस्ता मार्गी लागून औद्योगिक वसाहत ते डोंगरगाव व केवरेला जोडणार असल्याने कामगार , दुग्धव्यवसायिक व नागरिकांचे दळणवळण सुलभ होणार,असे माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांनी सांगितले .

डोंगरगाव व केवरे रेल्वेगेटवर तसेच वेताळेनगर येथील मलशुध्दीकरण प्रकल्प येथे लोणावळा औद्योगिक वसाहतीतीमधील , रस्ता जोडला जाणारा सुमारे एक कोटी ४७ लाख निधी असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार श्री.भेगडे यांचे हस्ते व लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , डोंगरगाव चे सरपंच बाळकृष्ण येवले तसेच उपसरपंच सौ.स्वाती सुभाष खोले यांचे उपस्थितीमधे भूमिपूजन नारळ फोडून व टिकाव मारून करण्यात आले.

यावेळी श्री.भेगडे बोलत होते. डोंगरगाव केवरे ग्रूपग्रामपंचायतचे वतीने सरपंच सुनिल येवले व उपसरपंच स्वाती खोले यांचे हस्ते माजी आमदार श्री भेगडे यांचा आणि लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचा शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री.भेगडे पुढे बोलताना म्हणाले,मला पहिल्या टर्मला वारकरी व शेतकरी असतानाही लोकांनी सुमारे सोळा हजार मतांनी निवडून दिले.समोर मातब्बर व सुशिक्षित शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे असताना लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले. विरोधी आमदार म्हणून दहा वर्षे असताना मी पालकमंञी व पाणीपुरवठा मंञी आजितदादा पवार यांचेशी गोड बोलून कुसगाव डोंगरगाव पाणीपुरवठा योजनेसाठी सात लाख निधी आणला.वलवण धरणातून पाणीपुरवठ्याबाबत निर्णय झाल्यावर दहा टक्के लोकवर्गणी सिंहगड काॕलेज च्या श्री.नवले यांनी देण्याचे मान्य केल्याने योजना मार्गी लागली. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव या पूर्वी आडीच व आता पाच वर्षे आसे साडेसात वर्षे जोरात काम केले , त्यामुळे लोणावळा नगरपरिषदेला चार वर्षे सलग पुरस्कार मिळाला आहे, असे त्यांनी भाषणात बोलताना सांगितले .

यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव म्हणाल्या , गेल्या पंचवीस वर्षात जी कामे झाली नाहीत,ती या पाच वर्षात झाली.नव्वद टक्के रस्ते झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर कोटी निधी दिल्यामुळे लोणावळ्याच्या गल्लीबोळात विकास झाला.स्वच्छ सर्वेक्षण मधे पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी या टीमला परत निवडून द्या. डोंगरगाव ला आयटीआय कडून रस्त्याचे डांबरीकरण करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या सर्वांनी प्रयत्न केल्याने निधी देता आला.

प्रास्तविक करताना डोंगरगाव चे सरपंच सुनिल येवले म्हणाले , लोणावळ्याच्या कुशीत असलेल्या डोंगरगाव , केवरे ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी असून विकास कामे करताना अडचणी येतात.म्हणून आम्ही नगरपरिषदेकडे मागणी करून पाठपुरावा केल्यामुळे निधी आला . माजी उपसरपंच संजय जायगुडे म्हणाले , आम्ही रस्त्याचे काम पूर्वी बंद पाडले ;त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आता नगराध्यक्षा यांचे प्रयत्नाने .रस्त्याचे काम होणार आसल्याचा आम्हाला आनंद वाटतो.

यावेळी पोलिसपाटील जयश्री कचरे म्हणाल्या , सुरेखाताई जाधव यांचे रूपाने आम्हाला सिंधूताई सपकाळ भेटल्या आहेत. त्यांनी आमच्या गावावर मायेची पाखर टाकून आमचे दुःख रस्त्याचे रूपाने हलके केले आहे. यावेळी शिक्षक विजय आप्पा कचरे यांनीही लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांचे आमच्या गावाला निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी लोणावळ्याच्या नगरसेविका रचना सिनकर , जयश्री आहेर, लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , नगरसेवक ललीत सिसोदिया , नगरसेवक गटनेते देविदास कडू , डोंगरगाव चे माजी उपसरपंच कांताराम दळवी , ग्रामपंचायत सदय्य प्रदिप घोलप, भाऊसाहेब भिवडे, ज्ञानेश्वर वाघमारे , देवा दळवी , सतिश चव्हाण , माजी उपसरपंच सविता जायगुडे,सदस्या जयश्री राजूभाऊ दळवी, अनिता अनंता दळवी , माजी उपसरपंच संंजय जायगुडे , माजी चेअरमन महादू जायगुडे , सामाजिक कार्यकर्ते सुभाष खोले, राजूभाऊ दळवी , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर , , महाराष्ट्र वहातूक सेना जिल्हाध्यक्ष पंकज खोले आदी उपस्थित होते .

यावेळी ठेकेदार श्री .पाळेकर यांचा सत्कार नगराध्यक्षा यांचे हस्ते करण्यात आला.. सूञसंचालन वहातूक सेना जिल्हाध्यक्ष पंकज खोले यांनी केले. आभार माजी उपसरपंच संजय जायगुडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!