आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आनंदाचे डोही आनंद तरंग एक– अनुभूती!

80% च्याही वर मार्क मिळवणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा- रोख रक्कम- गुलाबपुष्प आणि डॉक्टर शालिग्राम भंडारी लिखित पुस्तक या भेटवस्तू प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला.

Spread the love

आनंदाचे डोही आनंद तरंग एक– अनुभूती!

रम्यसंध्याकाळी ज्येष्ठ मित्र मंडळ नागरिक संघातील उपस्थित सभासदांनी अत्यंत अविस्मरणीय आनंदात अनुभवली! निमित्त होतं– आपल्या अथक अविरत परिश्रमातून घवघवीत यश संपादन केलेल्या नाती- नातवांचं कौतुक आणि आशीर्वाद प्रदान समारंभ!

विद्यार्थ्यांना आशीर्वाद आणि विशेष मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित होते- इंद्रायणी महाविद्यालयाचे उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगेसर आणि वडगाव येथील बाफना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गायकवाडसर! दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर– मान्यवरांच्या शुभहस्ते गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली! मंडळाच्या कार्यवाह, गीता वालावलकर मॅडम- यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला! मंडळाचे अध्यक्ष ” सुधाकर रेम्बोटकर” यांनी सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं! मंडळाचे माजी अध्यक्ष  विठ्ठल कांबळे, यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला! त्यानंतर यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अभ्यासातील आपण साध्य केलेली प्रगती आणि भविष्यकालीन आपल्या संकल्पना या विषयी आपापली मनोगत व्यक्त केलीत! नातवांची मनोगत ऐकल्यानंतर आजी आजोबांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून आपल्या नातवांना कौतुकाच्या श्रावण सरीत चिंब चिंब भिजवून टाकले!  संभाजी मलगे सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केलं! भविष्यकालीन विविध अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले! कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांची आणि स्वलिखित अशा दोन कविता सादर करून समारंभाची उंची वाढवली! त्याबरोबरच शासनाकडून येणाऱ्या 28 हजार रुपयांच अनुदानही जाहीर केलं!

वडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सरांनी सादर केलेल्या विविध कवितेतून- विशेषतः आईची कविता सादर करून– आजी-आजोबाचं आपल्या नातवांशी असलेल्या आपल्या अतूट नात्याविषयी अत्यंत भीज शब्दात वर्णन केलं! त्यानंतर जवळ जवळ 80% च्याही वर मार्क मिळवणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा- रोख रक्कम- गुलाबपुष्प आणि डॉक्टर शालिग्राम भंडारी लिखित पुस्तक या भेटवस्तू प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला. समारोपात आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर भंडारींनी- प्रत्येक मुलीत सुप्त स्वरूपात किती प्रचंड शक्ती असते याच अत्यंत समर्पक उदाहरण देऊन स्पष्ट केले; याबरोबरच अभ्यास कसा करावा? उज्वल भविष्यासाठी आर्थिक- बौद्धिक_ सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला झेपणाराच अभ्यासक्रम का निवडावा हे आपल्या पुढील मनोगतात स्पष्ट केले! कारण त्यातूनच आपण आपला वैयक्तिक विकास आणि कौटुंबिक कर्तव्य कसे पार पाडू शकतो ?–हे एका रिकाम्या पेल्याच्या माध्यमातून विशद केले! मंडळाचे खजिनदार,विठ्ठल कदम यांनी सर्वांचे आभार मानले. विठ्ठल कांबळे यांनी सांघिक प्रार्थना सादर केल्यानंतर चविष्टभजी आणि उफाळलेला गरम गरम चहा याचा सर्व उपस्थितानी आनंद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली!

–आपल्या अथक परिश्रमातून विशेष प्राविण्य मिळवलेल्या दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची यादी खालील प्रमाणे—- दहावीचे विद्यार्थी– *कुमारी समीक्षा सतीश यादव! शौनक मुंगीकर! अमेय विवेक बडवे!! बारावीचे विद्यार्थी खालील प्रमाणे– कुमारी मानसी विद्याधर इनामदार! अथर्व राजेंद्र गुरव! कुमारी श्रावणी तुषार विभुते! कुमारी साक्षी महेश भेगडे! चिरंजीव सोहम शरद कदम! कुमारी तन्वी अभय हेंद्रे! कुमारी आर्या अतुल पंडित आणि श्री वाघमारे सरांचा नातू* या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा समारंभ अत्यंत देखणा आणि यशस्वी करण्यासाठी–   दिगंबर कुलकर्णी-  गीता वालावलकर मॅडम-  विठ्ठल कदम-  विठ्ठल कांबळे, आशाताई जैन-  रंजना मुंगीकर आणि अध्यक्ष  सुधाकर रेम्बोटकर सरांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!