महाराष्ट्र

गणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना दे धक्का, शिंदे गटातील 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल.....

Spread the love

गणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना दे धक्का, शिंदे गटातील 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

आवाज न्यूज। दि. १९ जुलै । शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचे इन्कमिंग सुरूच आहे. पण, अशातच भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून सेनेला हादरा दिला आहे. आमदारांचा वेगळा गट फोडल्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण नवी मुंबईमध्ये भाजपनेच शिंदे गटाला धक्का दिला आहे. आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजप मध्ये दाखल झाले आहे. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत गवते यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!