आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती निर्मुलनचा पुणे जिल्हा मेळावा संपन्न

Spread the love

महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती निर्मुलनचा पुणे जिल्हा मेळावा संपन्न

आवाज न्यूज चिंचवड 26 ः चिंचवड येथिल प्रतिभा कॉलेज येथे पुणे जिल्हा प्रेरणा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यास 60 पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख अतिथी प्रा.अभ्रा रॉय यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी प्रास्तविक केले. उपस्थित कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला.
विविध शाखेंचा कार्यअहवाल सादरकरणार्‍यात वसंत कदम पुणे शहर, विजय सुर्वे पिंपरी चिंचवड, अलका जाधव बाणेर, सविता कोठावळे भोर शाखा, अनिल वेल्हाळ कर्वेनगर शाखा, जाधव सर निगडी शाखा, सामंत सर हिंजवडी शाखा, पांडुरंग तिखे लोणावळा शाखा, विवेक सांबरे मानसमित्र यांनी सादर केला. तर, डॉ. नितीन हांडे यांनी सामाजिक माध्यम प्रशिक्षण घेतले. सद्यस्थितीत विविध माध्यमांचे कसे महत्व आहे हे त्यांनी विशद केले.

दुसर्‍या सत्रात चमत्कार प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात आले. मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, विवेक सांबरे यांनी विविध चमत्कार कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. कल्याणचे आलेले राजू कोळी यांनीही चमत्काराचे प्रयोगाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली नितीन हांडे, शुभांगी घनवट, गडकरी सर यांनी प्रबोधनाची गाणी घेतली. प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चमत्कार प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे दाखवून दिले.
ज्येष्ठ कार्यकर्ता विश्वास पेंडसे यांनी प्रबोधन दिंडीतर्फे बाणेर येथील कार्यकर्ते रवी वरखेडकर यांना जिल्ह्यातील नवीन कार्यकर्त्यांसाठीचा प्रेरणा पुरस्कार दिला. डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी सोनद सेवा प्रबोधिनी तर्फे डॉ. नरेंद्र दाभोळकर उत्कृष्ट कार्यकर्ता गौरव पुरस्कार स्वरुपात दिले जाणारे पुरस्कार राजू जाधव व अंजली इंगळे यांना जाहीर केले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनी कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक व सल्लागार म.अंनिस पुणे डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वाटप प्रतिभा महाविद्यालयातील सभागृह येथे होणार आहे. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे यांनी आभार मानले. श्रीपाल ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले.

अतीशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात मेळावा पार पडल्याने कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला. मेळावा यशस्वी होण्यासाठी डॉ.अरुण बुरांडे, विजय सुर्वे, राजु जाधव, शुभांगी घनवट, सुभाष सोळंकी धनंजय कोठावळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!