महाराष्ट्र

शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजीनाट्य ; ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट

आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचाही पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे समजते.

Spread the love
शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजीनाट्य ; ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट

 आवाज न्यूज: हर्षल अल्पे, मुंबई प्रतिनिधी ९ ऑगष्ट.

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनात पार पडला. यामध्ये एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांचा समावेश होता. मात्र याचवेळी शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचाही पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे समजते.

शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी मिळालेली नाही. त्यामुळे महिला आमदारांमध्ये देखील नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर टीईटी शिक्षक भरती घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव आल्याने ते वादात सापडले होते. मात्र आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार संजय राठोडयांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने शिंदे गटात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या बंगल्यावर शिंदे गटातील आमदारांची बैठक झाली होती. यामध्ये अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली होती. यात आमदार सुहास कांदे भरत गोगावले बच्चू कडू, सदा सरवणकर मंगेश कुडाळकर यांच्यासह अनेक आमदारांचा सामावेश होता.तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक आमदारांना संधी न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात या आमदारांना संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!