आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

रक्षाबंधन चे पूर्वसंधेला राखी खरेदीसाठी लोणावळ्यातील दुकानात गर्दी ..

दहा रूपये पासून पुढे मोठ्या किमतीला डझनप्रमाणे राखी खरेदीसाठी बहिणींनी आज लोणावळा बाजारपेठेत गर्दी केलेली पहायला मिळाली.

Spread the love

रक्षाबंधन चे पूर्वसंधेला राखी खरेदीसाठी लोणावळ्यातील दुकानात गर्दी ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१०प्रतिनिधी

रक्षाबंधन चे पूर्वसंधेला राखी खरेदीसाठी लोणावळ्यातील दुकानात गर्दी झाली होती.
दहा रूपये पासून पुढे मोठ्या किमतीला डझनप्रमाणे राखी खरेदीसाठी बहिणींनी आज लोणावळा बाजारपेठेत गर्दी केलेली पहायला मिळाली.

गोंडे असलेल्या व विविध आकर्षक व्हरायटी असलेल्या , लाईट असलेल्या , छोटा भीम , डोरोमाॕन , अशा राख्या तसेच खडे , मणी , रूद्राक्ष , ओम , , स्वस्तिक , मेरे भैया , आणि तिरंगी रंगापासून विविधरंगी राख्या विक्रीसाठी उपलब्द होत्या.

छञपती शिवाजी महाराज चौकात दुकाने लावलेल्या दुकानदारांनी प्लॕस्टीक लावलेल्या दुकानावर पावसाच्या पाण्यामुळे व जोरात आलेल्या वा-यामुळे छत उडून जाण्याची भीती होती . येथील दुकानदारांनी त्यापासून संरक्षण होण्यासाठी प्रयत्न केल्याने दुकाने उडून जाता जाता वाचवण्यात यश आले.
सायंकाळी व राञीच्या वेळी महिलांची प्रचंड गर्दी लाडक्या भाऊरायाला मनाजोगी राखी घेताना दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!