आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून अनोखे रक्षाबंधन..

संबंध महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा श्रावण महिन्यातील पवित्र असा सण म्हणजे भावा बहिनीचे अतूट नातं असलेला रक्षाबंधन.

Spread the love

  पिंपरी चिंचवडमध्ये वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून अनोखे रक्षाबंधन..

  आवाज न्यूज चिंचवड प्रतिनिधी११ ऑगष्ट..

संबंध महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा श्रावण महिन्यातील पवित्र असा सण म्हणजे भावा बहिनीचे अतूट नातं असलेला रक्षाबंधन.

राखी हे विश्वासाच प्रतिक आहे , हाच विश्वास मनात ठेवून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ज्या कोरोना योध्यांनी व बारा महिने जे स्वताच्या जीवाची पर्वा न करता खरंतर कठीण काळातही दिवसरात्र प्रामाणिकरित्या अविरतपणे जे कार्य करत असतात असे सर्वांचे बंधू अँम्ब्युलन्स चालक त्यांच्यासाठी हा आजचा सन त्यांच्या सोबत साजरा करून त्यांचे देखील समाजात एक महत्वाचे स्थान आहे, हे महत्व पटवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न युवतींनी केला व आजचा रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने वाय. सी. एम हॉस्पिटल या ठिकाणी युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला.

यावेळी सुहास पलांडे, नवनाथ वाडेकर, विजय शेलके, रामचंद्र जगताप, गणेश कामते, सचिन सुतार, नंदकुमार शिखरे, नरेंद्र पाटिल, राहुल माटेकर इ.चालकांना राखी बांधून शलाका बनकर, मेहेक इनामदार,शुभदा पवार, भव्यशीला गायकवाड़,मेघना जगताप,वैभवी गावड़े, वैष्णवी जगताप,इ. युवतींनी सहभाग घेतला व आजचा कार्यक्रम पार पडला.यावेळी वर्षा जगताप म्हणाल्या, खरचं ह्या धकाधकीच्या काळात मनाला समाधान मिळणे अशक्य पण आज ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाले असल्याची भावना त्यांनी माध्यमांशी बोलून दाखवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!