आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

12 ऑगस्ट (1892) हा दिवस डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जन्म दिवस

डॉ. रंगनाथन हे मुळ व्यवसायाने मद्रास विदयापीठामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. मुलांनी गणिताचा अभ्यास करावा म्हणून त्यांनी एकदा मुलांना ग्रंथालयातील गणिताची सर्व पुस्तके दाखविली

Spread the love

आवाज न्यूज: गुलामअली भालदार ११ ऑगष्ट..

12 ऑगस्ट (1892) हा दिवस डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जन्म दिवस

भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथपालन शास्ञास शास्ञ शुध्द विज्ञानची जोड देणारे व भारतात आधुनिक ग्रंथालयाची चळवळ यशस्वीरित्या राबविणारे ते थोर ग्रंथपाल होते. भारतात सार्वजनिक व शैक्षणिक ग्रंथालय प्रणालीचा विकास झाला, यात त्यांचे मोठे योगदान आहे.

ग्रंथालय सार्वजनिक असो अथवा शैक्षणिक ती एक समाज घडविणारी व राष्ट्रीय मुल्ये जपणारी एक संस्था असते. ग्रंथ हे गुरू आहेत वा ग्रंथ हे मिञ आहेत हे आपण बालपणापासुनच ऐकले आहे. योग्य मिञाची वा गुरूची निवड माणसाच्या आयुष्याचे परिस्पर्शाप्रमाणे सोने करते. अशा योग्य ग्रंथाची निवड करणे़ व योग्यवेळी वाचकांना देणे हे ग्रंथालयाच्या यशस्वीतेचे एकओळी सुञ आहे. माहिती़, ज्ञान, विकास, संशोधन व यशस्वीता याचा मार्ग ग्रंथालयाच्या दारातून जातो. वाचनाची आवड असणारे लोक ज्ञान जपतात़ व निर्माण करतात व आपले क्षेञ समृदध बनवितात व ग्रंथालये हे ज्ञान पुढच्या पिढीला हस्तांतरीत करतात.

त्यासाठी ग्रंथपाल ही जबाबदारी फार महत्चाची आहे. आजच्या ग्रंथपालास छापील पुस्तकांच्या बरोबरीने इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाईन पुस्तके ही संग्रही ठेवावी लागतात.
डॉ. रंगनाथन हे मुळ व्यवसायाने मद्रास विदयापीठामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. मुलांनी गणिताचा अभ्यास करावा म्हणून त्यांनी एकदा मुलांना ग्रंथालयातील गणिताची सर्व पुस्तके दाखविली तेव्हा ग्रंथालयाच्या प्रभावाने त्यांचा अभ्यास वाढला. तेव्हापासून एक तळमळीचा शिक्षक एकतळमळीचा ग्रंथपाल होऊन गेला. पुढे विदयापीठाने त्यांच्यवर ग्रंथालय संशोधन व विकासाची जबाबदारी दिली़ ती सार्थ ठरवित त्यांनी ग्रंथपालन शास्ञास नवी दिशा दिली. ग्रंथालयाची वाढ़ विकास, गुणवत्ता व उपयोग यांना चालना देणारी जगमान्य पंचसुञी जगाला दिली. ग्रंथ हे बंदिस्त न ठेवता ते उपयोगात आले पाहिजेत. प्रत्येक वाचकाला त्याच्यासाठी उपयुक्त ग्रंथ मिळाला पाहिजे. प्रत्येक ग्रंथ वाचला गेला पाहिजे़. वाचकाला विनाविलंब त्याचा ग्रंथ मिळाल पाहिजे व ग्रंथालयाची वाढ व संग्रही साहित्याचा विकास झाला पाहिजे. पंचसुञीतील ही तत्वे कालबधित असुन आजच्या हायटेक लायब्ररी 2.0 वा 3.0 च्या व्हर्जनलाही ती लागु होतात. आज पारंपारीक ग्रंथपाल यांनी कात टाकली असुन ग्रंथालयात Cloud Computing, IoT, Artificial Intelligence, RFID, robotics, drone- technology इ. टेक्नालॉजीचा शिरकाव झाला आहे.

ग्रंथपाालन हे व्यवस्थापन शास्ञाप्रमाणे कला व विज्ञान यांचा अंमल आहे. ती एक नोकरी नसून ती शैक्षणिक भुमिका,सामाजिक जबाबदारी व राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या विदयार्थ्यांना वाचन साहित्याची माहीती देणे़ वाचनाची आवड लावणे ती वृंद्धिगत करणे़ देशाचा जबाबदार नागरिक बनण्यास प्रवृत्त करणे ही ग्रंथपालाची व्यवसायीक जबाबदारी आहे. त्यासाठी तो परंपरागत ते अदयावत साधनांचा उपयोग करण्यास तो सक्षम असला पाहिजे. कारण सोशल मिडीयाच्या युगातही वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. कारण ग्रंथालयाची पानेच आजच्या आणि उदयाच्या पिढीला स्वातंञ्याचे़, समतेचे़, नात्यांचे़, त्यागाचे, शौर्याचे़, देशप्रेमाचे जाज्वल्य इतिहासाचे बाळकडु देत राहतील.
मीना डोंगरे, ग्रंथपाल प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज़, चिंचवड़, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!