आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीत दुपारी चारच्या सुमारास एक तरुण गेला वाहून…

इंद्रायणी नदीतील पाण्याचा खूप वेग असल्याने वैभव देसाई याचा शोध घेता आला नाही.

Spread the love

मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीत  दुपारी चारच्या सुमारास एक तरुण वाहून गेला.

आवाज न्यूज :राजेश बारणे ,मावळ प्रतिनिधी १२ ऑगष्ट 

वैभव देसाई तरुणाचे नाव असून तो आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ खवय्या हॉटेल येथे राहतो. तो मूळचा गोव्याचा आहे, असे वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी दिली.

देसाई हा त्याच्या  मित्रांबरोबर कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी आला होता. कुंडमळा हे पर्यटनस्थळ तळेगाव दाभाडे या शहरापासून जवळ आहे. पुराच्या पाण्यात खेळत असताना वैभवचा पाय घसरल्याने तो इंद्रायणी नदीत पडून पाण्याच्या तीव्र वेगामुळे वाहून गेला.

नीलेश गराडे, गणेश ढोरे, दीपक नळे, प्रशांत शेडे, भास्कर माळी, सत्यम सावंत व इतर वन्यजीव रक्षक मावळचे सदस्य घटनास्थळी पोहोचले होते. तसेच तळेगाव दाभाडे व तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील कुंडमळा येथे पोहोचले होते. परंतु इंद्रायणी नदीतील पाण्याचा खूप वेग असल्याने त्यांना वैभव देसाई याचा शोध घेता आला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!