महाराष्ट्र

बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन

दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय..

Spread the love
 राजकीय…. बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. किरण होले हे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. मात्र, आता त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत हातात शिवबंधन बांधलं आहे.

याव्यतिरिक्त दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील काँग्रेसचे सरपंच योगेश मापारी यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय. अचानक प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळे दर्यापूर तालुक्यात शिवसेना पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!