आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

लोणावळा येथील श्री समर्थकृपा कला केंद्रातील कलाकार श्री गणेशमुर्ती रंगकामात व्यस्त..!

पीओपी ला मंजुरी व उंचीवर मर्यादा नसल्याने कलाकारांमधे उत्साह..!

Spread the love

लोणावळा येथील श्री समर्थकृपा कला केंद्रातील कलाकार     श्रीगणेशमुर्ती रंगकामात व्यस्त; पीओपी ला मंजुरी व उंचीवर मर्यादा नसल्याने कलाकारांमधे उत्साह..!

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२८ प्रतिनिधी

लोणावळा येथील श्री समर्थकृपा कला केंद्रातील कलाकार गणेशमुर्ती रंगकामात व्यस्त असल्याचे येथील कारखान्यात आवाजन्यूज प्रतिनिधीने आढावा घेतला असता दिसून आले. सुमारे पन्नास वर्षापूर्वी आजोबांनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून तिसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे.

या श्री समर्थकृपा कला केंद्राचे मालक  अविनाश नथुराम होजगे आणि संचालक , कारागीर संजय नथुराम होजगे यांनी एक फुटापासून दहा फुटांपर्यत विविध आकार प्रकारचे श्री गणेशमुर्ती बनविल्या आहेत. पीओपी ला परवानगी आणि आकार , उंचीवरील बंधने शिथील केल्याने  शिंदे -फडणवीस सरकारने दिलासा दिल्याने तसेच गणपती गाडीला टोलमाफीमधून वगळल्याने कलाकारांनाही काम करायला हुरूप आला आहे. सुमारे एक हजाराचे घरात गणेशमुर्ती बनविण्यात आल्याने हा मावळातील सर्वात मोठा गणेशमुर्ती कारखाना आहे , असे म्हटले तर आतिशोक्ती ठरू नये !

या कारखान्यात आखणीकार भूषण दत्ताञेय वाजेकर , डिझायर ओंकार श्रीकांत बोडके , शेडींग कुणाल संजय होजगे आणि नकूल संजय होजगे हे पहात आहेत. कारागीरांमधे चंद्रकांत रामदास दळवी , कुणाल गणेश जाधव , पूर्तता संजय होजगे , ओम राऊत , रोहीत सुतार , वेदांत मरे , दिनेश गावडसे , प्रमोद हारपुडे , जगन्नाथ मंडपे , वल्लभ चाळके , अखिलेश शर्मा , गौरव कुडले , करण सैदापुरे , सूर्यकांत हाळुंदे , आदी येथे दिवस राञ श्री गणेशमुर्ती बनविणे , रंगविणे या कामात व्यस्त आहेत.
या कलाकेंद्राचे व्यवस्थापक कुणाल होजगे व नकूल होजगे हे बंधू जबाबदारी सांभाळीत आहेत.

लोणावळा , ठाणे , तळेगाव , औध , दौड आदी ठिकाणी गणपती मंडळांच्यावतीने बुकींग करण्यात आली आहे.
लालबागचा राजा , पंचमुखी , चिँचपोकळी , दगडूशेठ हलवाई , वरद विनायक , पेशवाई , तसेच टिटवाळा , अष्टविनायक , तसेच बालमुर्ती आणि सिंह , मोर , यावर आरूढ झालेल्या गणेश मुर्तींची येये मोठ्या प्रमाणात निर्मिती व विक्री होते.
या कला केंद्राचा प्रारंभ संजय व अविनाश होजगे यांचे आईचे
वडील , आजोबा कै.सुधाकर अनंत देशमुख यांनी पायाभरणी केलेल्या या कलाकेंद्राची सुरूवात पन्नास वर्षापूर्वी होजगे यांचे वडील कै.नथुराम होजगे यांनी केली आणि आज एक हजाराचे वर येथे गणेश मुर्ती तयार होत आहेत.

येथे गणेशोत्सवाच्या नंतर नवरौत्सवातही श्री नवदुर्गा , वाघेश्वरी , वाघजाई , आदींच्या मुर्ती येथे साकार होतात., असे व्यवस्थापक कुणाल होजगे व नकूल होजगे यांचेतर्फे  सांगण्यात आले..

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!