आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये आयईटीई विद्यार्थी मंचाचे उदघाटन..

आयईटीई पुणे विभागाचे डॉ. डी.एस. मंत्री वाईस चेअरमन, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख डॉ. विलास देवतारे, आयईटीई मंचाच्या समन्वयक प्रा. नीता कराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये आयईटीई विद्यार्थी मंचाचे उदघाटन

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, १ सप्टेंबर.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअर्स या विद्यार्थी मंचाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी आयईटीई पुणे विभागाचे डॉ. डी.एस. मंत्री वाईस चेअरमन, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख डॉ. विलास देवतारे, आयईटीई मंचाच्या समन्वयक प्रा. नीता कराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयईटीई मंचाच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कार्यशाळा, व्याख्याने, प्रकल्प प्रदर्शन आयोजित केले जातील तसेच विविध कौशल्याधिष्ठीत उपक्रमांमध्ये सहभागी होता येथील, असे प्रतिपादन आयईटीई पुणे विभागाचे वाईस चेअरमन डॉ. मंत्री यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिका कलगते, हर्षदा चौधरी आणि ऋतुजा माळी या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन आईटीई विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार कालेकर यानी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!