आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर पाडणारी असावी : आमदार सुनिल शेळके

तळेगाव दाभाडे शहरातील नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

Spread the love

नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर पाडणारी असावी : आमदार सुनिल शेळके

आवाज न्यूज: राजेश बारणे, तळेगाव दाभाडे ८ सप्टेंबर.

आमदार सुनिल शेळके यांनी (गुरूवार, दि.८) तळेगाव दाभाडे शहरातील नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार शेळके म्हणाले, आपल्या तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक वारसा आहे.नवीन प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर पाडणारी असावी.यासाठी हे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी अधिकारी व ठेकेदाराने देखील गांभीर्याने लक्ष द्यावे.’ अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी‌ विजयकुमार सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक अरुण माने, आदि.मान्यवर उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामा संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पावसाचा अंदाज घेऊन लवकरच इमारतीच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!