आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन शैक्षणिक धोरण हे परिवर्तनाचे साधन : डॉ. देविदास गोल्हर..

प्रतिभा महाविद्यालयात सात दिवसीय प्राध्यापक गुणवत्ता विकसन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Spread the love

नवीन शैक्षणिक धोरण हे परिवर्तनाचे साधन : डॉ. देविदास गोल्हर

आवाज न्यूज गुलामअली भालदार  चिंचवड , १५ सप्टेंबर. 

प्रतिभा महाविद्यालयात सात दिवसीय प्राध्यापक गुणवत्ता विकसन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांतर्गत मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हर हे नवीन शैक्षणिक धोरण हे परिवर्तनाचे साधन या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, पुढे त्यांनी विस्तृतपणे बहुविद्याशाखीय, आंतरशाखीय शिक्षण प्रणाली व त्याची महाविद्यालयीन अंमलबजावणी कशी करावयाची याची माहिती दिली. याचा विद्यार्थ्याना होणारा फायदा याबाबतही  सखोल मार्गदर्शन केले.

लोणी काळभोर येथील एम.आय.टी. शांती विद्यापीठातील प्रा. मधुकर कस्तुरे यांनी कोर्स व प्रोग्राम आऊटकम यांच्यातील परस्पर जुळवणी व विश्लेषण यावर उदाहरणासहीत मार्गदर्शन केले. संबंधित विषयाला आवश्यक असणारे सूत्र व त्याचा उपयोगही त्यांनी सांगितला.

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या अधिव्याख्याता डॉ. प्रतिक्षा वाबळे यांनी आय.टी.सी.ची विविध माध्यमे व त्याची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याबाबतचे मार्गदर्शन व उपयोग सांगितले. सिम्बॉयसीस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट च्या संचालिका डॉ. शर्वरी शुक्ला यांनी संशोधन, संशोधनासाठी लागणारा निधी कसा मिळवायचा याबाबत मार्गदर्शन करून संशोधनासाठी निधी देणार्‍या संस्था कोणत्या त्याची कार्यप्रणाली याबाबती बहुमोल मार्गदर्शन केले.

प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी शिक्षणासाठी येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून घेणे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सात दिवस चालविण्यात आलेल्या कार्यशाळेची सांगता संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी महाविद्यालयीन आचार संहिता या विषयाने केली.

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कमला एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, गुणवत्ता विभागाच्या समन्वयिका डॉ. जयश्री मुळे, प्राध्यापक समितीच्या प्रा. जयश्री कांबळे समवेत इतर प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!