आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कै.कुसूम चिंतामण तिकोणे यांचे ९९ व्या वर्षी दुःखदनिधन…..

Spread the love

 

भांगरवाडी येथील जेष्ट कार्यकर्त्या कुसूम चिँतामण तिकोणे यांचे निधन..

आवाज न्यूजः  मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१७ (प्रतिनिधी )

भांगरवाडी येथील जेष्ट कार्यकर्त्या कुसूम चिँतामण तिकोणे यांचे ता.९ रोजी सकाळी ११ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांचे पश्चात तीन विवाहीत मुलगे , दोन विवाहीत मुली , सुना , नातवंडे ,जावई असा परिवार आहे.

लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व फोर्स जीमचे मालक मारूती चिँतामण तिकोणे , ए.बी.सी कंपनीचे सेवानिवृत्त कामगार दत्ताञेय चिंतामण तिकोणे , आणि लोणावळा नगरपरिषद करविभाग लिपिक रविंद्र चिंतामण तिकोणे हे त्यांचे सुपुञ होत. कै.तिकोणे यांनी मूळगाव महागाव येथून भांगरवाडी येथे स्थायिक झाल्यावर स्वकष्ठातून संसार फुलवला. मुलामुलींचे विवाह करून त्यांचेकडून समाजातील जनतेच्या सेवेसाठी नगरपरिषदेमधे मुलाला निवडून आणले. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात तिकोणे घराण्याचे नाव उंचावर नेले. त्यांच्या दोन विवाहीत मुली .लता एकनाथ कुटे व ललीता दिलीप पवार या समाज कार्यात कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!