आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात झालेल्या भाजपा, शिवसेना ,आर.पी.आय.( A ) महायुतीच्या टाळाठोक आंदोलनास यश

सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांना दिले सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश...

Spread the love

भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात झालेल्या भाजपा, शिवसेना ,आर.पी.आय.( A ) महायुतीच्या टाळाठोक आंदोलनास यश – सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांना दिले सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश…

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१९(प्रतिनिधी )

भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात झालेल्या भाजपा, शिवसेना ,आर.पी.आय.( A ) महायुतीच्या टाळाठोक आंदोलनास यश आले. वडगाव येथील सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांना दिले सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे अश्वासान देण्यात आले.

सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी तालुक्यातील गृहनिर्माण संस्था,कृषी विकास संस्था,विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बेकायदेशीर निर्णय घेतले असून या सर्व निर्णयांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी करून देखील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने आज भाजपा शिवसेना आर.पी.आय.(A) महायुतीच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालयावर टाळाठोक आंदोलन करून या भ्रष्ट अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, रीपाई चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे,मा.सभापती ज्ञानेश्वरजी दळवी यांनी विठ्ठल सुर्यवंशी यांनी केलेल्या बेकायदेशीर निर्णयाचा पाढा जनतेसमोर मांडून त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यास पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली; तर माजी सभापती गुलाब म्हाळसकर, आर.पी.आय तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, मा.उपसभापती शांताराम बापु कदम,सरचिटणीस बाळासाहेब जाधव,शहराध्यक्ष अनंता  कुडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू  शिंदे,महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,
गणेशजी धानिवले, डॉ.बाळासाहेब पलांडे, शत्रुघ्न  धनवे,ज्ञानेश्वर भाऊ आडकर आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्री.विठ्ठल सुर्यवंशी यांनी त्या-त्या गावातील सोसायटी मध्ये घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयाची माहिती जनतेसमोर मांडली व अशा भ्रष्ट मग्रूर अधिकाऱ्याचे निलंबन करून तालुक्यातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलकांशी उपनिबंधक .बाळासाहेब तावरे यांनी चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  विठ्ठल सुर्यवंशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय केला असल्याचे सांगून त्यांची लवकरात लवकर सखोल उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई केली जाईल व उद्या पासून ते या कार्यालयात दिसणार नाहीत असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे घोषित करण्यात आले.

यावेळी प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर,ज्येष्ठ नेते मा.सभापती निवृत्ती भाऊ शेटे, रीपाई युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र खांडभोर, मा.अध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, मा.सभापती ज्योतीताई शिंदे, मा.उपसभापती निकिता घोटकुले, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, सरपंच प्रमोद  दळवी,पी.एम. आर.डी.सदस्य कुलदीप  बोडके, कोषाध्यक्ष सुधाकर  ढोरे, विठ्ठल  घारे, नामदेव भसे,सरचिटणीस सुनील  चव्हाण, किरण राक्षे, मच्छिंद्र  केदारी, युवानेते अंकुश  सोनवणे,युवा नेते गणेश  ठाकर,मा.सरपंच नितीन  कुडे,युवा नेते सचिन  काजळे,युवा नेते सचिन  येवले,मा.जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव, धनश्रीताई भोंडवे, सीमा आहेर, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास  लिंभोरे, मातंग समाज अध्यक्ष सचिन भांडे, शासकीय आघाडी अध्यक्ष रवि आंद्रे आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी सहकार आघाडी उपाध्यक्ष विनायक पोटफोडे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण  शिंदे, विनायक भेगडे,विठ्ठल  तुर्डे,संतोष  असवले यांच्यासह वडगाव शहरातील सर्व पदाधिकारी नगरसेवक तथा मावळ तालुक्यातील भाजपा,शिवसेना,आर.पी.आय.(A) महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!