देश विदेशमहाराष्ट्र

वेदांता कंपनी ही तर देवेंद्र फडणवीस यांची नरेंद्र मोदींच्या आग्रहाखातर गुजरात निवडणुकीसाठीची रेवडी भेट! – मुकुंद किर्दत, राज्य प्रवक्ता, आप…

महाराष्ट्रात कंपनीला जरी गुंतवणूक करण्यात रस असला तरी आज भाजपला गुजरात मध्ये रोजगार निर्मितीत आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी काहीतरी दाखवणे गरजेचे आहे.

Spread the love

 राजकीय : वेदांता कंपनी ही तर देवेंद्र फडणवीस यांची नरेंद्र मोदींच्या आग्रहाखातर गुजरात निवडणुकीसाठीची रेवडी भेट! – मुकुंद किर्दत, राज्य प्रवक्ता, आप

आवाज न्यूज: राजेश बारणे, मावळ,  १८ सप्टेंबर.

वेदांता फॉक्सकाँन कंपनी साधारणपणे दीड लाख कोटी ची गुंतवणूक पुणे जिल्ह्यात करणार होती. परंतु अचानक हा प्रोजेक्ट गुजरातकडे गेला. यावर प्रस्थापित पक्ष एकमेकांना दोष देत आहेत. महाविकास आघाडी भाजपवर ठपका ठेवत आहे, तर भाजप -शिंदे गट हा महाविकास आघाडीला दोष देत आहे. खरे तर महाराष्ट्राने या कंपनीला बऱ्याच सवलती म्हणजे स्टॅम्प ड्युटी पासून जमीन, विज बिल आदी मध्ये घसघशीत सवलती देण्याचे ठरवले होते. अचानक गुजरात मध्ये ही कंपनी गेली आणि त्यानिमित्ताने सव्वा लाख रोजगार संधी गमावली याला जबाबदार कोण ?  हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्यक्षामध्ये या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीस प्रथम पसंती दिली असावी असे एकूण कागदपत्रावरून वाटते.

परंतु गेल्या महिनाभरामध्ये गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने जो धडाका लावला आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे तो पाहून भाजपचे धाबे दणाणले आहे. मोदी सरकार सिसोदियांच्या मागे खोटेनाटे आरोप लावते आहे तर आरोग्य मंत्री जैन यांच्यावरही असेच आरोप करून त्यांना अटक केली आहे. गुजरात मध्ये रोजगारावरून सामान्य जनतेमध्ये रोष आहे याला सामोरे जाण्यासाठी मोदींना काहीतरी करून दाखवण्याची गरज होती आणि त्यामुळेच देवेंद्र फडवणीस यांनी मोदींना गुजरातसाठीची ही भेट दिली आहे. महाराष्ट्रात कंपनीला जरी गुंतवणूक करण्यात रस असला तरी आज भाजपला गुजरात मध्ये रोजगार निर्मितीत आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी काहीतरी दाखवणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राचे सत्ता हातात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांचे काय व्हायचे ते होऊ दे गुजरात मध्ये मात्र निवडणुकांमध्ये फायदा व्हायला हवा.

निवडणूक,सत्ता अधिक महत्त्वाची,मराठी माणूस जाऊदे खड्ड्यात असं धोरण भाजप -शिंदे गटाचे असल्याने देवेंद्र यांनी नरेंद्र यांच्या आग्रहाखातर गुजरातला दिलेली ही निवडणूक रेवडी आहे! असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!