आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आळंदी नगरपरिषदेतील, प्रभाग क्रमांक 2 मधील नागरीक गेली दहा वर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत..

विद्यमान आमदार तसेच स्वर्गीय माजी आमदार यांच्याकडे सतत पाठ पुरावा करत आहेत परंतु त्यांची फक्त आश्वासन देऊन बोळवण केली जाते.

Spread the love

आळंदी नगरपरिषदेतील, प्रभाग क्रमांक 2 मधील नागरीक गेली दहा वर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत !!

आवाज न्यूज: आळंदी, प्रतिनिधी, १९ सप्टेंबर..

तीर्थक्षेत्र आळंदी येथील प्रभाग क्रमांक 2 वडगांव रोड गोशाळा मागे ,क्षीरसागर निवास ते कोद्रे निवास रस्ता ,येथील नागरीक गेली दहा वर्षे झाली आळंदी नगरपरिषदेला नियमित पणे कर भरतात ,परंतु आजपर्यंत नगरपरिषदेने येथील नागरीकांसाठी रस्ता वीज ड्रेनेज लाईन या मूलभूत बाबी साठी एक रुपया ही खर्च केला नाही .

सदरील रस्त्याचा निधी चालू पंचवार्षिक मध्ये तीन वेळा मंजूर होऊन देखील या प्रभागातील नगरसेवक विरोधी पक्षाचा आहे म्हणून या रस्त्याचा निधी दुसऱ्या प्रभागातील रस्त्यांसाठी वापरला जातो या रस्त्यासाठी येथील नगरसेवक विरोधी पक्षनेते तुषार अरुण घुंडरे हे एकदा आमरण उपोषणाला बसले होते, त्यावेळी सत्ताधाऱ्यानी फक्त पोकळ आश्वासने दिली.

येथील नागरीक सुध्दा गेली पाच वर्षे झाली नगर परिषद कडे पायाभूत सुविधा साठी सतत पाठ पुरावा करत आहेत परंतु त्यांना थातुर मातुर कारण सांगितली जातात.

विद्यमान आमदार तसेच स्वर्गीय माजी आमदार यांच्याकडे सतत पाठ पुरावा करत आहेत परंतु त्यांची फक्त आश्वासन देऊन बोळवण केली जाते.

अर्धवट अवस्थेत असलेल्या ड्रेनेज लाईन मुळे चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर येऊन, येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी अपेक्षा येथील रहिवाशी व्यक्त करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!