आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळेगाव दाभाडे शहर यांच्यामार्फत श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन…

समस्त तळेगाव नगरीच्या कल्याणासाठी नवचंडी याग, रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी श्री दुर्गा माता मंदिर भोई आळी येथे..

Spread the love

विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळेगाव दाभाडे शहर यांच्यामार्फत श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन…

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, २२ सप्टेंबर :

बजरंग दल तळेगाव दाभाडे शहर यांच्यामार्फत सालाबाद प्रमाणे याही वर्षी घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत रोज तळेगावातील प्रमुख मंदिरामध्ये 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान रोज सकाळी सहा वाजता एकत्रीकरण करण्याचे नियोजन केलेले आहे.

यासोबत समस्त तळेगाव नगरीच्या कल्याणासाठी नवचंडी याग चे आयोजन रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी श्री दुर्गा माता मंदिर भोई आळी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियोजित करण्यात आलेले आहे.

तसेच शस्त्र पूजन व रावण दहन विजयादशमी उत्सव बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी मारुती मंदिर प्रांगण येथे सायंकाळी सात वाजता नियोजित केले आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषद पदाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे.

त्यासोबत शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मारुती मंदिर चौक येथून दुर्गा वहिनी शोभायात्रा व तोरण मिरवणूक काढण्यात येणार आहे तेव्हा तळेगावकर नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त संख्येने सहभागी व्हावे असे देखील आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!