आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहाचे लोणावळ्यात ता.२८ ते २ आॕक्टोबर आयोजन..

देशाचे पंतप्रधान नरेँद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे दिवसापासून ता.२आॕक्टोबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा सेवा पंधरवडा...

Spread the love

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहाचे लोणावळ्यात ता.२८ ते २ आॕक्टोबर आयोजन..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२८ प्रतिनिधी.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहाचे लोणावळ्यात ता.२८ ते २ आॕक्टोबर आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेँद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे दिवसापासून ता.२आॕक्टोबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा सेवा पंधरवडा महसूल विभागाच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात , लोणावळा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यत आयोजित करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी ताथा प्रांताधिकारी संदेश शिर्के , मावळचे तहसिलदार तथा दंडाधिकारी मधुसुदन बर्गे , महसूल नायब तहसिलदार प्रसन्न केदारी आणि लोणावळा मंडलच्यावतीने मंडल अधिकारी बी.के.मेकाले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

या सेवा पंधरवडा मधे महसूल विभागाच्या खालील सेवांचा समावेश आहे.

१)उत्पन्न दाखले, २)जातीचे दाखले , ३)रहिवाशी दाखले वाटप ,४), मतदार यादीत नाव समाविष्ठ करणे ,५),मतदार यादीत नावात दुरूस्ती करणे , ६) प्रलंबित फैरफार निर्गत करणे , अहवाल १ मधे असलेल्या ७/१२ दुरूस्ती करणे, ७) मंडल अधिकारी स्थरावरील प्रलंबित तक्रार केसेस निर्गत करणे , ८)आधारकार्ड काढले ,आधारकार्ड अद्ययावत करणे, दुबार रेशनकार्ड काढणे , रेशनकार्ड विभक्त करणे , संजय गांधी योजना , श्रावणबाळ योजना , इंदिरा गांधी योजना यांना योजनेचा लाभ देणे ,आदी कामे करण्यात येणार आहे.
महसूल विभाग मावळ तालुका यांच्या मार्फत या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त लाभार्थी यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!