आरोग्य व शिक्षणकृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

शिखर रायडर्स” च्या चार-धाम मोटारसायकल मोहिमेचा यशस्वी समारोप !

Spread the love

शिखर रायडर्स” च्या चार-धाम मोटारसायकल मोहिमेचा यशस्वी समारोप !

आवाज न्यूज: चिंचवड १ ऑक्टोबर.

वार्धक्याकडे झुकल्यानंतर बरेच जण तिर्थयात्रेचा मार्ग निवडतात, नव्हे तर समजमाणसात तसाच प्रघात आहे.  कोणी जर तारुण्यात तिर्थयात्रेला गेला तर त्याला टोमणे मारणारे पण समाजात कमी नाहीत. मात्र तीर्थयात्रा तर करायची पण, या सर्व गोष्टींना फाटा देत एक वेगळी वाट चोखळंदतच करायची.

याच एका विचाराने  चिंचवड येथील “शिखर फाऊंडेशन” अॅडव्हेंचर क्लब च्या श्री. प्रविण पवार, राजेश चिंचवडे, सुधीर गायकवाड, शिवाजी आंधळे, गणपत बारवकर, गुलाब जरांडे आणि नंदकुमार लिंबोरे या सात सदस्यांनी एकत्र येत ‘उत्तराखंड’  मधील हिमालयीन “चार धाम”  मोटारसायकल मोहिमेचे आयोजन केले होते. त्याची यशस्वी सांगता रविवारी झाली.

गणपती विसर्जनानंतर दिंनाक १० सप्टेंबर रोजी पाच मोटारसायकल सह सात स्वार सुयोग्य तयारीनिशी दुपारी २:०० वाजता मोहिमेवर निघाले. पहिला मुक्काम पुण्यापासून ३५० किमी वर असलेल्या ‘धुळे’ येथे झाला. दुसरा मध्यप्रदेश मधील ‘गुणा’ तर तिसरा मुक्काम १७०० किमी अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेश मधील ‘मेरठ’ येथे. तर चौथ्या दिवशी दुपारपर्यंत मेरठ, मुज़फ़्फ़रनगर, सरहानपूर मार्गे उत्तराखंड मधील विकासनगर गाठले. विकासनगर येथून हिमालयीन पर्वत रांगांना सुरुवात होते. विकासनगर ते जानकी चट्टी हा १५० कि.मी चा संपुर्ण घाट रस्ता पार करत चौथ्या दिवशी चा मुक्काम जानकी चट्टी येथे केला.

बुधवार दिनांक १४ सप्टेंबर पासून पहिला धाम समजल्या जाणाऱ्या यमुनोत्री ( यमुना नदीचे उगमस्थान ) च्या दर्शनाने चार धाम यात्रेला प्रांरभ केला . यमुनोत्री ते गंगोत्री (दुसरा धाम ) २२० किमी, गंगोत्री ते केदारनाथ (तिसरा धाम ) ३४० किमी आणि केदारनाथ ते बद्रीनाथ (चौथा धाम ) २०५ किमी असा प्रवास करत २० सप्टेंबर रोजी बद्रीनाथ धाम चे दर्शन घेतले. त्याच बरोबर जगातील सर्वांत उंचीवरचे शिवमंदीर असलेल्या व पंचकेदार पैकी एक असलेल्या  चोपता येथील “तुंगनाथ” तसेच जगातील सर्वात उंचावरील ( १५५०० फूट) गुरुद्वारा असलेल्या “हेमकुंड साहिब” या स्थळांना पण भेटी दिल्या.

  • संपूर्ण मोहिमेत या सर्व तिर्थस्थळांना भेटी देत असताना १०२ किलोमीटर चा ट्रेक करावा लागला. या मध्ये विशेष बाब म्हणजे पुण्यापासून मोटारसायकाल वर प्रवास करून सुद्धा न थकता गैरीकुंड ते केदारनाथ आणि पुन्हा त्याच दिवशी परत गैरीकुंडला परत येत एकाच दिवसात ४० किमी चे आंतर १५ तासात कापण्याचा पराक्रम केला. त्याच बरोबर सर्व तिर्थस्थळानां भेटी देऊन पुणे पर्यंतचा परतीचा प्रवास पण मोटारसायकल वरच केला.सदर मोहिमेतील राईडर्स नी पुणे – उत्तराखंड – पुणे असा सहा राज्यातून प्रवास करत ४८८१ किलोमीटरचे आंतर आवघ्या पंधरा दिवसात पार केले.

तत्पूर्वी सदर मोहिमेला “शिखर फाऊंडेशन” चे अध्यक्ष विवेकानंद तापकीर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.याप्रंसगी टाटा मोटर्स कर्मचारी पतपेढीचे उपाध्यक्ष मंगेश जोशी आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते. मोहिमेच्या समारोपानंतर टाटा मोटर्स कार विभागाचे प्रमुख श्री.श्याम सिंग सर आणि आय आर हेड श्री. गौरीशंकर  पात्रा तसेच टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री. सचिन भैय्या लांडगे, अजित पायगुडे आणि युनियन प्रनिनिधी यांच्या हस्ते टीमचा यथोचीत गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!