आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बबनराव भेगडे यांना “सहकार भूषण ” पुरस्कार सन्मान..

श्रीडोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा..

Spread the love

बबनराव भेगडे यांना “सहकार भूषण ” पुरस्कार सन्मान

श्रीडोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे २ ऑक्टोबर

 

आपण किती चांगले काम करतो या वर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते ,गेली ३१ वर्ष संस्था काम करीत आहे व ती चांगले करीत आहे म्हणूनच आजचा दिवस आहे”. सहकार क्षेत्रात राज्य व देश पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल होत असून देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झाले या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवीन दिशा देण्याचे धोरण अवलंबिले आहे

६३ लाख पेक्षा जास्त सोसायट्या ह्या ऑनलाइन झाल्या असून बाकी सोसायट्याना लवकरात लवकर ऑनलाईन करण्याचे धोरण सरकारने आखले आहे .असे प्रतिपदन मा राज्यमंत्री  बाळा भेगडे यांनी केले श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा इशा हॉटेल तळेगाव दाभाडे येथे पार पडली .सभेमध्ये गेली ४५ वर्षे सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल मान्यंरांच्या शुभहस्ते  बबनराव भेगडे याना मानपत्र फुले पगडी व उपरणे देऊन “सहकार भूषण ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या प्रवासा मध्ये सहा सहकारी संस्था चे श्री भेगडे यांनी स्थापन केल्या तसेच ६ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष ¸पुणे पुणे मध्यवर्ती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंतर अध्यक्ष¸ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघावर बिनविरोध निवड¸ सातत्याने ३ वेळा पुणे जिल्हा सहकारी बोर्डावर संचालक पदी निवड ¸तसेच सतत ३ वेळा पुणे पीपल्स बॅकेच्या संचालकपदी निवड.या अश्या सहकारातील पदे श्री भेगडे यांनी भूषवली.

सभेच्या अध्यक्ष स्थानी पुणे पीपल्स कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष  सुभाष मोहिते व प्रमुख व्यक्ते जेष्ठ लेखक पानिपतकर  विश्वास पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे मावळ आमदार  सुनील शेळके ¸माउली दाभाडे¸ बाप्पू भेगडे¸  गणेश काकडे  गणेश खांडगे  अशोकजी बाफना  विठ्ठलराव शिंदे  रवींद्र दाभाडे आदी तसेच मावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या ७५ व्या अमृत मोहस्तव निमित्त सी आर पी एफ चे डी आई जी आय आय एम  धीरज कुमार याना विशेष पुरस्कार देण्यात आला .याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे आधारसात  संतोष भेगडे यांनी केले तसेच संस्थे बाबत माहिती देताना संस्थेचे तीन हजारापेक्षा जास्त सभासद असून संस्थेने या वर्षी ६४ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला

. संस्थेने या वर्षी २५ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून संस्था दरवर्षी करीत असलेले विविध उपक्रम म्हणजेच महिलांकरिता अथर्व शीर्ष पठण¸दीपोत्सव बाबत माहिती दिली तसेच प्रस्तावना संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष  राहुल पारगे यांनी अत्याधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करून तसेच चांगल्या प्रकारची ग्राहक सेवा या पुढे देण्याचा मानस आहे. संस्थेच्या सभेत सभासदांना ११% लाभांश जाहीर करण्यात आला. सभेचे सूत्र संचालन  अतुल राऊत यांनी केले.तसेच संस्थेचे सर्व नवं निर्वाचित संचालक या वेळी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!