आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजमहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर अदखलपाञ गुन्हा दाखल…

लोणावळ्यात घेतले ताब्यात;वडगावात सोडले जामिनावर .?

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर अदखलपाञ गुन्हा दाखल;

लोणावळ्यात घेतले ताब्यात; वडगावात सोडले जामिनावर ?

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा ता.५ प्रतिनिधी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर अदखलपाञ गुन्हा
दाखल करून लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
वडगाव येथे आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते.याबाबत तपास करणारे अधिकारी यांचेकडून उशिरापर्यत माहिती मिळू शकली नाही.

आविनाश आप्पा वाघमारे (वय-३२,रा-साठेचाळ , घाटकोपर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या आरोपीला लोणावळ्यात ताब्यात घेतल्याचे शहर पोलिसांकडून समजले.

या आरोपीवर भा.द.वि.कलम १७७ व १८२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवसेना शिंदे गट यांचा विजयादशमी निमित्ताने बी के सी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचे पार्श्वभूमीवर  लोणावळा शहर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपीने शनिवारी राञी नऊ ते दहा दरम्यान साईकृपा हाॕटेल , वलवण येथे पाण्याच्या बाटलीचे किमतीवरून मालकाविरूध्द वाद घालत शंभर क्रमांकावर फोन करून धमकी दिल्याने लोणावळा शहर पोलिसांकडून तात्काळ दखल घेवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

आरोपी वाघमारे याने मद्यपान केल्याचे नादामधे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर हल्ला करण्याचा कट केल्याचे सांगून पोलिस प्रशासनाची झोप उडविली. माञ आसे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाही.नशेत असे घडून गेल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले..याबाबत सहाय्यक पोलिसनिरिक्षक .बावकर तपास करीत आहे..

आरोपीस आज दुपारी वडगाव न्यायलयात हजर करणार असल्याचे लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. माञ उशिरापर्यत याबाबत पोलिसांकडून फोन उचलला जात नसल्यामुळे आरोपी जामिनावर सुटला , की दसरा मेळाव्यानंतर आरोपीस सोडणार याबाबत माहिती मिळाली नाही..

शनिवारी ता.१ राञी नऊ ते १० दरम्यान ही घटना घडली.याबाबत पूर्ण महाराष्ट्रात याची बातमी पसरली व चर्चेत होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!