आरोग्य व शिक्षणकृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

इंग्लडच्या शिष्टमंडळाची ऐतिहासिक कार्ला नगरीला भेट..

४ जानेवारी १७७९ रोजी कार्ला येथे इंग्रज आणि मराठ्यांची लढाई झाली होती.या लढाईत इंग्रजाचा देशात सर्वात मोठा पराभव झाला होता.

Spread the love

इंग्लडच्या शिष्टमंडळाची ऐतिहासिक कार्ला नगरीला भेट

आवाज न्यूज : भाऊसाहेब हुलावळे,  लोणावळा वार्ताहर, ८ ऑक्टोबर.

४ जानेवारी १७७९ रोजी कार्ला येथे इंग्रज आणि मराठ्यांची लढाई झाली होती.या लढाईत इंग्रजाचा देशात सर्वात मोठा पराभव झाला होता.

तथाकथित इंग्रज सेनापती स्टुअर्ट फाकड्डा या लढाईत मारला गेला होता अशी नोंद आहे, कार्ला येथील ऐतिहासिक तळ्याकाठी स्टुअर्ट फाकड्डांचा स्तंभ आहे.या सर्व ऐतिहासिक घटनेची इंग्लंडच्या दप्तरी नोंद असुन त्याची साक्ष या शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट दिल्याने पाहण्यास मिळाली.शुक्रवारी इंग्लंड येथील पंधरा जणांच्या शिष्टमंडळाने ऐतिहासिक कार्ला नगरीला भेट दिली व येथील ऐतिहासिक घटनेविषयी माहीती घेतली.

इतिहासाचे अभ्यासक नितिन शास्त्री यांनी कार्ला येथील ऐतिहासिक लढाईची माहीती तसेच पुढील पिढीला देशात इंग्रज बरोबर झालेल्या सर्वात मोठ्या लढाईचा व या लढाईत मराठ्यांचा सर्वात मोठा विजय झाला होता याचे कायम स्मरण राहवे या करीता या ठिकाणी उभा राहत असलेल्या विजयस्तंभा विषयी माहीती सांगितली.

यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी स्मित हस्याने समाधान व्यक्त केले.या शिष्टमंडळात इंग्रज सेनादलाचे माजी कर्नल पॅट्रीक्स हे सामील होते. यावेळी कार्ला ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!