महाराष्ट्र

ॲड.विश्वनाथ दाभाडे यांचे निधन..

Spread the love

ॲड.विश्वनाथ दाभाडे यांचे निधन..

आवाज न्यूज: प्रतिनिधी.    तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष,भाजपचे ज्येष्ठ नेते , ॲड. विश्वनाथ जयवंतराव दाभाडे(वय ६९) यांचे निधन झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.ॲड. दाभाडे यांनी १९८७ ते १९८९या कालावधीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामकाज केले, ते सलग १० वर्षे नगरसेवक होते. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे मार्गी लागली. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी दहा वर्षे काम पाहिले. हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे ते सल्लागार होते. माजी सरपंच द्वारकानाथ दाभाडे, माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे यांचे ते ज्येष्ठ बंधू तर  ॲड. प्रशांत दाभाडे यांचे ते वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!