आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका यांच्या वतीने • अश्विन पौर्णिमा वर्षावास सांगता कार्यक्रम बौर येथे संपन्न.

भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष . रवि भवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले..

Spread the love

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर :

भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका यांच्या वतीने • अश्विन पौर्णिमा वर्षावास सांगता कार्यक्रम बौर येथे  दि. 9 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत रा. ट्रष्टी चेअरमन ॲड. सुभाष जौजाळे व उद्योजक. संजय जौजाळे  उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष . रवि भवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका नाणे मावळ आंदर मावळ व पवन मावळचे धम्म अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ॲड. सुभाष जौजाळे यांच्या हस्ते मावळ तालुका नवनिर्वाचित कार्यकारणीला नियुक्त पत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले हे सर्व नियोजन भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष. रवि भवार व सर्व कार्यकारणी पवनारंजन मित्र मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांनी केले भोजनदान करुन कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी नुकतीच अंदर मावळ उपाध्यक्षपदी पुर्ननिवड होणारे  तुकाराम डोळस यांच्या समवेत . रवि भवार,

राहुल जाधव,  विलास देसाई, . सुरेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सोनवणे, रामचंद्र भालेराव, . राजू जाधव,  नितीन ओव्हाळ , अशोक चौरे, संतोष कदम,  संदीप जाधव, आयु. किशोर गायकवाड, आयु. किरण भालेराव,  सौरभ भवार,  प्रमोद गायकवाड व इतर मावळ तालुका बौद्ध महासभा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे सर्व सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!