आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सतत चौकस राहून यशस्वी व्हावे : डॉ. दीपक शहा.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त पुस्तक वाचन व प्रदर्शनाचे आयोजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

Spread the love

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सतत चौकस राहून यशस्वी व्हावे : डॉ. दीपक शहा.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड प्रतिनिधी, १५ ऑक्टोबर.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त पुस्तक वाचन व प्रदर्शनाचे आयोजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी समवेत विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सचिव डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, डॉ. कलाम यांनी वर्तमानपत्रे विकून तसेच इतर कामे करून कुटुंबियांना मदत करीत असत. त्यांना गणित विषयाची विशेष रुची होती.

प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अभ्यास पूर्ण करीत होते, अभ्यास क्रमानंतर नासा या प्रसिद्ध संस्थेत काम केले. पुढे 2002 ते 2007 पर्यंत भारताचे 11 वे. राष्ट्रपती पद भुषविले. भारत महासत्त बनून जगात नावलौकिक मिळवेल असे स्वप्न सर्व भारतीयांना दिले, त्या स्वप्नाची पूर्तता विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या क्षेत्रात चमक दाखवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल रहावे, असे आवाहन केले.

या प्रदर्शनात स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक समवेत साहित्य क्षेत्रातील माजब्बर लेखक पु.ल.देशपांडे, ग.दी. मांडगूळकर, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, राम गडकरी यांच्या पुस्तकासमवेत हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमाची पुस्तके मांडण्यात आली होती., प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल मीना डोंगरे, सहाय्यक ग्रंथपाल सचिन गायकवाड, सीमा इंगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!