आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप जैन प्रकोष्ठ , श्रीमती लीलाबाई भुरट व भुरट परिवार , आनंद महिला मंडळ व आ.भारतीय मारवाडी महिला सम्मेलन तर्फे कँन्सरमुक्त अभियानांतर्गत ९२ लोकांची तपासणी..

आनंद महिला मंडळ अध्यक्षा प्रभाताई गदिया , आखिल भारतीय मारवाडी महिला संम्मेलन अध्यक्षा व माजी नगरसेविका संगीता भुरट यांचेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..

Spread the love

भाजप जैन प्रकोष्ठ , श्रीमती लीलाबाई भुरट व भुरट परिवार , आनंद महिला मंडळ व आ.भारतीय मारवाडी महिला सम्मेलन तर्फे कँन्सरमुक्त अभियानांतर्गत ९२ लोकांची तपासणी..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा ता.२०(प्रतिनिधी )

भाजप जैन प्रकोष्ठ , लोणावळा शहर व महाराष्ट्र यांचे वतीने  लीलाबाई भुरट व भुरट परिवार यांचे विशेष सहयोगाने , आनंद महिला मंडळ व आ.भारतीय मारवाडी महिला सम्मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने कँन्सरमुक्त अभियानांतर्गत ९२ लोकांची तपासणी कँन्सर डिक्टेशन बसचे माध्यमातून जैन स्थानकात करण्यात आली.


या कँन्सरमुक्त अभियानाला प्रमुख आतिथी म्हणून  लीलाबाई भुरट उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , सहसंयोजक पुणे जिल्हा भाजप जैन प्रकोष्ठ चे उपाध्यक्ष गिरीशजी डी.पारख , महाराष्ट्र राज्य भाजप जैन प्रकोष्ठ चे उपाध्यक्ष महेंद्रशेठ जे. कांकरिया , भाजप जैन प्रकोष्ठ लोणावळा शहराध्यक्ष संतोषजी चोरडीया ,लोणावळा शहर भाजप जैन प्रकोष्ठ सेक्रेटरी किशोर पारख , आनंद महिला मंडळ अध्यक्षा प्रभाताई गदिया , आखिल भारतीय मारवाडी महिला संम्मेलन अध्यक्षा व माजी नगरसेविका संगीता भुरट यांचेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..

यावेळी नवकार मंञाचे गायन व प्रास्ताविक  साधना टाटीया यांनी केले. यावेळी व्यासपीठावर लोणावळा सहकारी बँकेचे संचालक कन्हैया भुरट , उद्योजक प्रकाशजी भुरट , आदी उपस्थित होते.
यावेळी भाजप जैन प्रकोष्ठ चे प्रदेश उपाध्यक्ष नवरत्न फूडस चे मालक गिरीशजी डी.पारख म्हणाले.
सुमारे पंधरा हजाराचेवर लोकांनी या कँन्सरमुक्त अभियानाचा राज्यात लाभ घेतला आहे..
राज्याचे मंञी चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते या अभियानास प्रारंभ झाला असून भाजप जैन प्रकोष्ठ चे महामंञी ललीत  गांधी व महामंञी संदिप  भंडारी यांचेतर्फे ही कँन्सरमुक्त डिक्टेशन बस उपलब्ध करून दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव म्हणाल्या , या भाजप जैन प्रकोष्ठ , लोणावळा , महाराष्ट्र यांचेतर्फे तसेच  लीलाबाई भुरट काकी , तसेच आनंद महिला मंडळ आणि आ.भा.मारवाडी महिला संम्मेलन यांनी महिलांचे व पुरूषांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानते..या कँम्पमधे कुणीही कँन्सर ग्रस्त रूग्ण आढळु नये , असी मी देवाकडे प्रार्थना करते. हे कँन्सरमुक्त .शिबीर असल्याने मी शुभेच्छा तर देत नाही.पण महिलांनी न लाजता या संधीचा लाभ घ्यावा..भांगरवाडी येथे एक सत्तर वर्षीय महिलेची तपासणी केली.तर तिचा कँन्सर शेवटचे स्टेजला होता , ईलाज करता न आल्याने तिचा मृत्यू झाला ,त्यामुळे वेळीच सर्वांनी आपल्या घरातील तरूणी , वयस्कर यांची तपासणी करून घ्यावी..! ! हे असे उपक्रम भाजपचे जैन प्रकोष्ठ व प्रदेश उपाध्यक्ष महेंद्रशेठ कांकरिया , जिल्हा सहसंयोजक , उपाध्यक्ष , नवरत्न फूडसचे गिरीश पारख , तसेच जैन प्रकोष्ठ चे शहर अध्यक्ष संतोष चोरडीया , किशोर पारख तसेच लोणावळा येथिल प्रकाशशेठ भुरट , माजी सभापती नवीन भुरट , तसेच आनंद महिला मंडळांच्या प्रभाताई गदिया , आ.भा.मारवाडी महिला सम्मेलन अध्यक्षा संगीता भुरट. ता.१७ रोजी आधी महिला मंडळ सभागृहात कँन्सरमुक्त अभियान घेतले , त्यात चाळीस लोकांनी तपासणी करून घेतली.

पीटीएस खंडाळा येथे ता.१८ रोजी १३७ वा कँन्सरमुक्त अभियान शिबीराचा कार्यक्रम झाला पोलिस ट्रेनिंग सेंटर चे सुप्रिट्रेंड आॕफ पोलिस शशिकांत बोराटे यांचे प्रमुख उपस्थितीत व कार्यक्रमाचे प्रमुख आतिथी , लायन्स क्लाबचे झोन चेअरपरसन यांचे अध्यक्षस्थानावरून पार पडला..येथे सुमारे १०१ लोकांनी तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्षा.संध्या सुबोध खंडेलवाल , माजी नगरसेविका कंचन लुणावत , सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा जैन , रामदेवबाबा भक्त मंडळ अध्यक्ष राजेंद्र टाटीया , माजी नगरसेवक ललीत सिसोदिया , विशाल पाडाळे , लोणावळा नगरपरिषद शिक्षक संघटनेचे शिक्षक .पारधीसर , , तसेच लोणावळा चिक्की चे मालृक सोभाशेठ लुंकड ,वकील .लुंकड , माजी नगरसेविका शशीभाभी आगरवाल आदी उपस्थित होते. यावेळी सूञसंचालन साधना टाटीया यांनी केले.आभार आनंद महिला मंडळ अध्यक्षा प्रभाताई गदिया यांनी मानले. यावेळी भाजप जैन प्रकोष्ठ चेवतीने श्रीमती लीलाबाई भुरट यांचा शाल श्रीफळ देवून मोत्याची माळ घालून सत्कार करण्यात आला….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!