आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळचे भूमीपुत्र L&T कामगारांच्या ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस…

कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटना करणे म्हणजे गुन्हा आहे का..?

Spread the love

मावळचे भूमीपुत्र L&T कामगारांच्या ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस…

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ ऑक्टोबर.

या दिवाळीच्या काळात संपूर्ण पुणे जिल्ह्यातील फक्त एकच ठिय्या आंदोलन सुरू आहे ते म्हणजे मावळ भूमिपुत्र L&T डिफेन्स तळेगांव मावळ कामगारांचे ठिय्या आंदोलन… ज्याची सुरवात बुधवार १९ ऑक्टोबर २०२२ रोजी अप्पर कामगार आयुक्त वाकडेवाडी पुणे येथे झाली…
दिवाळी च्या सरकारी सुट्टया असल्याने कार्यालय बंद आहे
तरीही कामगारांचे बेमुद्दत ठिय्या आंदोलन अद्यापही सुरू आहे..

जो पर्येंत आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळणार नाही..तो पर्येंत हे आंदोलन सुरू राहणार.. L&T डिफेन्स तळेगांव मॅनेजमेंट ने वेळेतच कामगारांची दखल घ्यावी…
भूमीपुत्र कामगारांच्या संयमाचा अंत बघू नका.. कामगारांचा संयम सुटला तर हे आंदोलन अतितीव्र रौद्ररूप धारण करेल..

L&T डिफेन्स तळेगांव मॅनेजमेंट ची दिवाळी गोड सुरू आहे..
त्यांचा कुटुंबाची दिवाळी जोरदार सुरू आहे..
पण त्याच L&T डिफेन्स तळेगांव च्या कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात आहे..

कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटना करणे म्हणजे गुन्हा आहे का..?
आमच्या नोकऱ्या हिरावुन घेतल्या गेल्या..सरकार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांचे या मावळ भूमीपुत्र कामगारांच्याआंदोलनाकडे अद्यापही लक्ष दिलेल्या गेल्याचे दिसत नाही..

आज ज्या शेतकरी कुटुंबातील चिमुकल्या चा व्हिडीओ ची दखल जग भर घेतले गेली
आज जी भावना या चिमुकल्या ची आहे तशीच वेळ आज या मावळ भूमीपुत्र कामगारांच्या कुटुंबावर आहे..

आंदोलन कर्त्यामध्ये ,महेंद्र शिंदे, संदीप गायकवाड, प्रवीण साळवे, प्रसाद कुटे, देवा शिरसट, अक्षय घुले, एकनाथ बिनगुडे अशा २३५ लोकांनी सहभाग घेतला आहे.

देव करो या L&T मॅनेजमेंटला चांगली सद्बुद्धी देवो आणि कामगारांना न्याय मिळो.

 अशी मागणी, मावळ भूमीपुत्र कामगार L&T डिफेन्स तळेगांव ,मावळ भारतीय कामगार सेना, शिवसेना. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!