आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

‘झुंज’ चित्रपटाच्या चित्रीकरणास तळेगावात उत्साहात सुरुवात 

Spread the love

तळेगाव : येथील आई जगदंब फिल्म क्रिएशन निर्मित ‘झुंज’या हिंदी व मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास तळेगावातील तळे परिसर, रणजितसिंह कॉलनी येथे उत्साहाने सुरुवात झाली.

प्रशांत सुर्वे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी या आधीही सात ते आठ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ चिञपटाचे  निर्माते सुरेश धोत्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. आई जगदंब फिल्म क्रिएशन ही एक तळेगाव शहरातली नावाजलेली चित्रपट निर्मिती करणारी संस्था आहे. या संस्थेने झुंज या चित्रपटाद्वारे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी चित्रपट रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.यावेळी दिग्दर्शक प्रशांत सुर्वे, मैथिली वारंग,सहाय्यक दिग्दर्शक, प्रॉडक्शन मॅनेजर जाकीर भाई शेख,निर्माते सुरेश धोत्रे, कॅमेरामन बी लक्ष्मण,यांच्यासह नितीन शहा, गोपाल परदेशी ,सूर्यकांत आप्पा कदम, कलाकार रेश्मा जावलीकर, सुहास वैद्य ,प्रसाद सुर्वे, संतोष कदम, नितीन पाटील, मेकअप परमेश्वर केदार,एल पी सी प्रियंका सानप, पद्मा पार्टे, अश्विनी ढोके, स्नेहल गुंड, सोनाली मोरे, ईशा कुडवे ,नियन आर्या, सागर जाध,व अमोल आर्या, शिवाजी कदम आदी मान्यवरांसह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!