आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
पुढील लढाई न्यायालयामार्फतच…. किशोर आवारे
टोल का झोल, संदर्भातील पुढील लढाई न्यायालयामार्फतच लढणार असल्याचे किशोर आवारे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
पुढिल लढाई न्यायालयामार्फतच…. किशोर आवारे .. आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, १ नोव्हेंबर.
- सोमाटणे टोलनाक्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालया मध्ये सुनावणी सुरू असून टोलनाक्या संदर्भातील पुढील लढाई न्यायालयामार्फतच लढणार असल्याचे किशोर आवारे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. उच्च न्यायालयाने सदर टोलनाच्या संदर्भातील सुनावणीसाठी तीन लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची अट याचीकाकर्ते मिलिंद अच्युत यांना घातली होती.सदर रक्कम लोकवर्गणीतून भरणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते त्यानुसार लोकवर्गणीतून जमा झालेले तीन लाख रुपये उच्च न्यायालय मध्ये अनामत रक्कम भरण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालय मुंबई येथे होणार असून, सदर बाब न्यायप्रविष्ठ असल्याने उच्च न्यायालयाच्या मार्फतच पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी जनसेवा विकास समितीचे, संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांनी नमूद केले. यावेळी मुन्ना मोरे, आगरवाल साहेब, मिलिंद अच्युत उपस्थित होते.