आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने तळेगाव रत्न हा पुरस्कार प्रदान..

प्रखर प्रवचनकार परमपूज्य साध्वीजी प्रियमरसाश्रीजी महाराज व तपस्वीरत्न परमपूज्य साध्वीजी श्रेयमरसाश्रीजी महाराज यांना तळेगाव रत्न हा सन्मान देण्यात आला..

Spread the love

 

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने तळेगाव रत्न हा पुरस्कार प्रदान..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ९ नोव्हेंबर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने प्रखर प्रवचनकार परमपूज्य साध्वीजी प्रियमरसाश्रीजी महाराज व तपस्वीरत्न परमपूज्य साध्वीजी श्रेयमरसाश्रीजी महाराज यांना तळेगाव रत्न हा सन्मान देण्यात आला..चातुर्मास निमित्त तळेगाव दाभाडे शहरात आलेले हे दोन्ही गुरू भगवंत तळेगाव शहरात अनेक वेगवेगळ्या विषयावर यांनी प्रवचने दिली, तळेगाव शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी फार मोठे योगदान दिले.

“गुरु माता पिता आणि संस्कार” या विषयावरील त्यांची व्याख्याने खूप प्रसिद्ध आहेत.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने आरोग्य क्षेत्रामध्ये चालू असलेले उल्लेखनीय कार्या बद्दल प्रेमरसाश्रीजी महाराज साहेब यांनी रोटरी क्लबचे कौतुक केले व रोटरी क्लबने आरोग्य क्षेत्रामध्ये दीनदुबळ्या गरीब यांची सेवा करावी अशी विनंती केली.
तर श्रेयमरसाश्रीजी गुरु महाराज यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्लबचे चालू असलेले उल्लेखनीय कार्य याबद्दल गौरवोद्गार काढले, आपण आम्हाला दिलेला तळेगाव रत्न हा पुरस्कार आम्ही विनम्रपणे स्वीकारतो..

तळेगाव शहरात चातुर्मास निमित्त आलेल्या गुरु भगवंतांना तळेगाव जैन संघाने आपल्या मुली मानलेल्या आहेत त्यामुळे त्या गुरू खऱ्या अर्थाने तळेगाव वासिया झाल्या.

अध्यक्ष रो दीपक फल्ले यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल क्लबच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले. तर सन्मान पत्राचे वाचन प्रकल्प प्रमुख रो किरण ओसवल यांनी केले.
कार्यक्रमास विश्वस्त अनिल भाई मेहता,भवरलाल संघवी,दिनेश शहा , रमेशभाई निबजीया,डॉ दीपक शाह, प्रकाश ओसवाल, रो दिलीप पारेख, रो विनोद राठोड, रो राकेश ओसवाल, रो संजय मेहता, रो संजय वाघमारे मनोज राठोड हे उपस्थित होते.
अलभा पारेख, अनिता किरण ओसवाल, जोशना राठोड, भावना राठोड व  अनिता परमार यांनी नियोजन केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!