कृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

कुमार, निकोरोमन व महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताबसाठी होणार लढत.

पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताबाची लढत दि. १ ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान जाणता राजा कुस्ती केंद्र लोणी कंद ता. हवेली जि.पुणे येथे होणार..

Spread the love

कुमार, निकोरोमन व महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताबसाठी होणार लढत.Kumar, Nikoroman and the women’s state championship wrestling tournament and the first women’s Maharashtra Kesari title will be fought.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १५ मार्च.

कुमार, निकोरोमन व महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब.कुमार, ग्रिकोरोमन व महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताबाची लढत दि. १ ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान जाणता राजा कुस्ती केंद्र लोणी कंद ता. हवेली जि.पुणे येथे होणार आहेत त्यासाठी राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर ची निवड चाचणी दि. २५ व २६ मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम मंगळवार पेठ पुणे येथे होणार आहे.

दि.२५ रोजी ग्रीकोरोमन व महिला सकाळी ९ ते११ वजन व संध्याकाळी ४ वाजता निवड चाचणी सुरू होईल. सिकोरोमन वजनगट – ५६ किलो, ६० किलो, ६४ किलो, ६७ किलो, ७२ किलो, ७७ किलो, ८२ किलो ८७ किलो, ९७ किलो, १३० किलो.जन्मतारीख: २००३ अथवा त्याअगोदर ची असावी. व २००४ व २००५ पालकांचे संमतीपत्र व वैदकीय दाखला असणे बंधनकारक राहील.

महिला वजनगट:- ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो, खुला महाराष्ट्र केसरी गट ६८ ते ७६ किलो, जन्मतारीख : २००३ अथवा त्याअगोदर ची असावी. व २००४ व २००५ पालकांचे संमतीपत्र व वैदकीय दाखला असणे बंधनकारक राहील.

दि.२६.३.२०२३ रोजी कुमार मुले, सकाळी ९ ते ११ वजन व संध्याकाळी ४ वाजता निवड चाचणी सुरू होईल.. कुमार मुले वजनगट :- ४५किलो ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७१ किलो ८० किलो, ९२ किलो, ११० किलो, जन्मतारीख :- २००६ व २००७ असावी. व २००८ साठी पालकांचे संमतीपत्र व वैद्यकीय दाखला असणे बंधनकारक राहील.

अधिक माहितीसाठी, अविनाश टकले 9881771166 – व योगेश पवार 9766312444 पुणे यांच्याशी संपर्क साधावा.

शिवाजी बुचडे..सचिव राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर. यांनी आवाज न्यूजला माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!