आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

योग साधनेची प्रतिकृती शहरवासीयांना प्रेरणादायी ठरेल ः डॉ. दीपक शहा..

Spread the love

योग साधनेची प्रतिकृती शहरवासीयांना प्रेरणादायी ठरेल ः डॉ. दीपक शहा..Replication of Yoga Sadhana will inspire the city dwellers: Dr. Deepak Shah..

आवाज न्यूज  : चिंचवड प्रतिनिधी १५ मार्च.

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चिंचवड स्टेशन चौक वाहतूक बेट सुशोभिकरण करून देखभाल करणेस पी.पी.पी. तत्त्वावर मान्यता दिली. संस्थेच्या वतीने चौकात योग साधनेचे अप्रतिम प्रतिकृती बसविण्यात आले त्याचे उद्घाटन माजी महापौर तुषार हिंगे, नगरसेविका वैशाली काळभोर, मिनल यादव यांच्या हस्ते फीत कापून आज करण्यात आले.

त्यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, हितेन करानी, व्यापारी दिलीप पारेख, सचिन पारेख, अतूल शहा, महिपाल सोनिगरा, आर्किटेक्चर सालवी शहा समवेत चिंचवड स्टेशन परिसरातील व्यापारी वर्ग उपस्थित होता.

यावेळी डॉ. दीपक शहा यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर, स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रमे राबवित आहे. या चौकात भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेले योग्य साधनेची भव्य प्रतिकृती स्थापन केली आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा खूप मोठी असून प्राचीन काळापासून योग साधनेद्वारे आत्मचिंतन व शरीर स्वास्थाकरीताचा संदेश समाजात दिला जातो.

योगसाधना परदेशात सुद्धा आज अवलंबली जात आहे. युवक वर्गही या साधनेबरोबर जोडला जात आहे योगसाधनेची प्रतिकृती या चौकात शिक्षण, तंत्रज्ञान, शेती व औद्योगिक क्षेत्र स्वरूपात प्रतिबिंबित करण्यात आली आहे व चिंचवड स्टेशन चौक बेट सुशोभिकरण केले हे पाहून शहरवासीयांना उर्जा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

सायंकाळी या योगसाधना या प्रतिकृती भोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी पालिकेच्या उद्यान विभागाचे विशेष आभार डॉ. दीपक शहा यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उद्याटन सोहळा प्रसंगी माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका वैशाली काळभोर, मिनल यादव यांनी संस्थेचे आभार व्यक्त करून आपल्या मनोगतात म्हणाले, चिंचवड चौकात सुशोभिकरण केल्याबद्दल शहराच्या सौंदर्यात भर पडेल, अशा शब्दात डॉ. दीपक शहा व संस्थेचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!