आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

राज्यात ७७५१ग्रामपंचायतीच्या निवडणूका, किती आहे, सरपंचासह सदस्यांची खर्च मर्यादा? निवडणूकखर्च कधी करावा लागतो सादर? पहा,सर्व नियम..

Spread the love

राज्यात ७७५१ग्रामपंचायतीच्या निवडणूका, किती आहे, सरपंचासह सदस्यांची खर्च मर्यादा? निवडणूकखर्च कधी करावा लागतो सादर? पहा,सर्व नियम..       

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ नोव्हेंबर.

राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 34 जिल्ह्यांतील 7751 निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. काही ग्रामपंचातींची 18 नोव्हेंबरपासून आचारसंहिताही लागली असून 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

जर तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली आहे, आणि विजय मिळवला आहे ? किंवा आता होऊ घातलेल्या ग्रामपंचातीच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावू पाहत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

निवडणुकीत बाजी मारल्यानंतर तुम्ही आनंदात तर असलाच मात्र आनंदाच्या भरात काही गोष्टी देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण या गोष्टींचा विसर तुमचे सरपंचपद किंवा ग्रामपंचायत सदस्यत्व धोक्यात आणू शकते. तर या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे चला जाणून घेऊया..

निवडणूक खर्च वेळेत प्रशासनाकडे सादर केला नाही, तर त्यामुळे सदस्यत्व आणि सरपंचपदही रद्द होऊ शकते. हे तर तुम्हाला माहितीच असणं. परंतु
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या तालुक्यातील संबंधित तहसीलदारांकडे निकालानंतर 30 दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 झेडए नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिग्रहण, संचलन व नियंत्रण यांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे.

ग्रामपंचायतींमध्ये किमान 3 व कमाल 6 प्रभाग असतात, आयोगाच्या आदेशान्वये ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये खर्च करण्याची मर्यादा 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत देण्यात आली आहे.शिवाय थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपये इतक्या खर्चाची मर्यादा आहे.

असे आहेत नियम :-

निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने नॅशनल किंवा शेड्यूल्ड बँकेत आपले खाते उघडावे. आणि त्या खात्याचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा.बँकेच्या खात्यातूनच उमेदवारांनी निवडणुकीसाठी सर्व आर्थिक व्यवहार चेकद्वारे करावेत. (देणग्या, भेटी स्वीकारणे, कर्ज स्वीकारणे, पक्ष निधी मदत स्वीकारणे, निवडणूक खर्च सादर करणे, देयके अदा करणे आदी ) अत्यंत किरकोळस्वरुपाचे खर्च रोखीने करता येतील. तथापि त्याची व्हाऊचर्स पावती ठेवणे बंधनकारक आहे .

नामनिर्देशनपत्र भरल्यापासून निकाल लागेपर्यंत, केलेल्या खर्चाचा दैनंदिन तपशील प्रत्येक उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावा.उमेदवारांकडील एखाद्या निधीबाबत तक्रार प्राप्त झाली तर उमेदवाराविरुध्द कायदेशीर कारवाई होईल.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्रत्येक उमेदवाराने केलेल्या एकूण खर्चाचा तपशील, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

सदस्यांसाठी अशी असते खर्चाची मर्यादा :-
15 व 17 सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत उमेदवारांना 50 हजाराची मर्यादा

11 व 13 सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत उमेदवारांना 35 हजाराची मर्यादा

7 ते 9 सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत उमेदवारांना 25 हजाराची मर्यादा

सरपंचांना अशी आहे खर्चाची मर्यादा :-
15 व 17 सदस्य असणाऱ्या सरपंचपदाच्या उमेदवारांना 1 लाख 75 हजार रुपयांची मर्यादा आहे.

11 ते 13 सदस्य असणाऱ्या सरपंचपदाच्या उमेदवारांना 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

7 ते 9 सदस्यसंख्या असणाऱ्या सरपंचपदाच्या उमेदवारांना 50 हजार रुपयांची मर्यादा आहे.

बँकांच्या कारभारामुळे अनेकांना अडचणी :-
सदस्यांना निवडणुकीचा खर्च चेकद्वारेच करण्याचे आदेश आहेत. पण, अनेकवेळा बँका चेकबुक देत नाहीत. त्यामुळे बहुतांश सदस्य रोखीनेच खर्च करतात. त्यामुळे याबाबतीत जर कोणी तक्रारी केली तर संबंधित उमेदवाराचे सदस्यत्व अडचणीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!