आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

संकटातून भक्तांना तारण्यासाठी येत आहे एकवीरा आई..

आशीर्वाद तुझा एकवीरा आई' 28 नोव्हेंबरपासून सोम.-शनि., रात्री 8 वा.सोनी मराठी वाहिनीवर.

Spread the love

संकटातून भक्तांना तारण्यासाठी येत आहे एकवीरा आई. !

आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ 28 नोव्हेंबरपासून सोम.-शनि., रात्री 8 वा.सोनी मराठी वाहिनीवर.

आवाज न्यूज : हेमलता कचरे, लोणावळा २४ नोव्हेंबर:

२०२२: सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता अजून एक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच ‘ज्ञानेश्वर माऊली’, ‘गाथा नवनाथांची’ अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता सोनी मराठी ही लोकप्रिय वाहिनी एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येते आहे. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेतील कलाकारांनी कार्ला येथे लोणावळाजवळ एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फिक्शन हेड सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मालिकेचे शीर्षक गीत केवल वाळंज याने सादर केले.

विविध व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवारही ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री मयूरी वाघही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत आपण मयूरीला अनेक आव्हानात्मक भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र या मालिकेत ती आई एकवीरा हिची भूमिका कशाप्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त या मालिकेत निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ येत्या 28 नोव्हेंबरपासून, सोम. – शनि., रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेचे दोन वेगवेगळे उत्कंठावर्धक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यांतील आशयावरून असे लक्षात येते की, कलियुगातल्या दानवांचा नाश करण्यासाठी आणि संकटातून आपल्या भक्तांना तारण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एकवीरा आई येते आहे. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षकगीत अतिशय सुंदर झाले आहे. हे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे. एकवीरा आई चे भक्त या गीतावर नक्कीच ताल धरतील यात शंका नाही.

या मालिकेची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुळाक्षर प्रॉडक्शन ने केली आहे. विशेष म्हणाजे चिन्मय मांडलेकर स्वतः या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेत एकवीरा आई आणि तिचे भक्त यांचे अतूट नाते बघायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’, येत्या 28 नोव्हेंबरपासून, सोम.- शनि., रात्री 8 वाजता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!