आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

तालुकास्तरीय शालेय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत भाजे हायस्कूलच्या तिघांचा प्रथम क्रमांक..

विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे, मळवली येथील विद्यार्थ्यांनी मावळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात घवघवीत यश..

Spread the love

तालुकास्तरीय शालेय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत भाजे हायस्कूलच्या तिघांचा प्रथम क्रमांक 

आवाज न्यूज :  मळवली प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर.

विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे, मळवली येथील विद्यार्थ्यांनी मावळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

विद्या प्रसारिणी सभेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गो. व्यं. शिंगरे व संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे विविध शालेय उपक्रम योजले जातात. कु. समिक्षा बाळासाहेब तिकोणे या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने 14 वर्षे वयोगटात 36 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सुरज सुधीर गरवड या विद्यार्थ्याने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 17 वर्षे वयोगटात 52 वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच अनिल बंडू मरगळे हा 12 वी चा विद्यार्थी 57 किलो वजनी गटात 19 वर्षे वयोगटात प्रथम आला.

सर्व खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला असून सर्वांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. मावळ तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सोमाटणे फाटा कुस्ती संकुल येथे संपन्न झाल्या. या यशाबद्दल प्रशालेच्या प्राचार्या वर्षा क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक प्रशांत घाडगे, खेळाची आवड असणारे मुकुंद भोसले, परमेश्वर खाटपे व लिपिक कविता पोटे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!