ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत 5 सुवर्ण 28 रौप्य, 34 कास्य पदकासह महाराष्ट्र संघास उपविजेतेपद

Spread the love

पुणे: दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान राजापल्लम तामिळनाडू येथे पार पडलेल्या 19 व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत 22 राज्यांमधून 2500 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्यांमधून 74 खेळाडू सहभागी झाले, त्यापैकी 5 सुवर्ण, 28 रौप्य, 34 कास्य पदकासह उपविजेतेपद पटकावत महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा कायम ठेवला. सिलंबम हा खेळ भारतिय शिवकालीन युद्ध कलेवर आधारित असलेला खेळ असून यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालवणे, सुरुल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश असून हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेला खेळ आहे.

सुवर्णपदक प्राप्त खेळाडू

श्रीपादराज रायरीकर, समर्थक वर्धेकर, वैष्णवी मानकर, ईश्वरी कदम, संजना हिवरकर,

रौप्य पदक प्राप्त खेळाडू

ओजस जांभे, अथांग मुजुमले, सृजन लंके, लोकेश देवकर, राजवीर सुतार, क्षितिज घाटगे, व्यंकटेश चव्हाण, मल्हार केळकर, प्रणव पांढरे, ओम संगपुल्लम, मोहक बर्वे, विहान निकम, मनवा कुलकर्णी, स्वरा महिंद्रकर, मिरा बिडकर, प्रांजल कापसे, शांभवी सिवासने, ज्ञानेश्वरी मोरे, सई साळुंखे, अनन्या लावंड, साक्षी सोंडकर, सेजल गालिंदे, जान्हवी दुबे, मानसी भिसे, ऋतु नन्होरया निहारिका नाईक, ब्रम्हाक्षी मस्के, पायल खैरकर,

कास्य पदक प्राप्त खेळाडू

शार्लव यादव, युवराज डेंगळे, मेघ पाटील, अद्वैत बनकर, हर्षित सुराणा, ओजस पाठक, देवांश चव्हाण, साईराज इंगुळकर, अनिरुद्ध फिटके, शौर्य काकडे, दर्श भुजबळ, हर्षद जन्नु, सिद्धेश गालिंदे, वरद मराठे, सोमेश्वर बर्डे, भूषण बोडके, तन्मय पोटे, करण जोशी, भार्गव जोशी, सोहम खवनकर, ओम राठोड, सोहम घोडके, आदित्य रवनंग, आर्यन रुपवदे, शिवराज गावडे, चिन्मयी कुलकर्णी, अन्वी मेढेकर, आनंदी तनपुरे, सप्तश्री तिसगे, तन्वी रोकडे, हर्षदा चव्हाण, रश्मी उदगिरकर, माही कांक्रेजा. कुमार, वेदश्री

वरील सर्व खेळाडूंना ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन चे अध्यक्ष मा. श्री. पि.वाय आत्तार सर, महाराष्ट्र कोच मा. श्री. कुंडलिक कचाले, टीम मॅनेजर मा. श्री. नाझिम शेख, प्रशिक्षक मा. श्री. बाळा साठे सर. केशव मंगरूळे, श्रीधर कामळे, प्रवीण रूपवदे यांचे मार्गदर्शन लाभले. ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे सचिव मा. श्री. एस. डी. गायकवाड यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!