आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

औंढेखुर्द , औंढोली, पवनानगर , लोहगड , दुधिवरे ग्रामस्थांचे पुलातील रस्ता बंद केल्यामुळे होताहेत हाल.

Spread the love

औंढेखुर्द , औंढोली, पवनानगर , लोहगड , दुधिवरे ग्रामस्थांचे पुलातील रस्ता बंद केल्यामुळे होताहेत हाल.Villagers of Aundhekhurd, Aundholi, Pavananagar, Lohgad, Dudhivere are suffering due to the closure of the bridge road.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १ मार्च.

औंढेखुर्द , औंढोली, पवनानगर , लोहगड , दुधिवरे ग्रामस्थांचे पुलातील रस्ता बंद केल्यामुळे हाल होत आहेत.आय आर बी कंपनीकडून आचानक काल ता.२८ रोजी पुलातील रस्ता बंद करण्यात आल्याने सुमारे एक किलोमीटर आंतरावरून औंढे जुनापुलावरून एकविरा लाॕन्स जवळून वळसा घालूनच वाहनचालक , पादचारी , सायकल , कार , जीपचालक , ट्रकचालकांना जा ये करावी लागत आहे.

इंग्रजांनी जशी कोंडी हिंदुस्थानातील लोकांची केली तशी पध्दतच आय आर बी कंंपनीने वापरली आहे.औंढे , औंढोली , पाटण , भाजे , बोरज , मळवली , ताजे या गावातील तसेच डोँगरगाव , कुसगाव येथील जमिनी आय आर बी कंपनीकडून संपादन करण्यात आल्या. कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या .त्याचा मोबदला काहींनी कमी असल्याने घेतला नाही. ग्रामस्थांच्या जमिनी मातीमोल भावाने  घेतल्या गेल्या, त्याचा हा मोबदला आय आर बी कंंपनी देत आहे का?

 

औंढेखुर्द येथील पुलातून जा ये करणा-या शेकडो वाहनचालकांना जाण्या येण्यासाठी असलेला पूल बंद केल्यामुळे मोठीच गैरसोय झाली आहे.
याबाबत काही दिवसापूर्वी औंढेखुर्द , औंढोली येथील महिलांचे वतीने व ग्रामस्थांचे तर्फे रास्तारोको आंदोलनाचा निर्णय घेतला होता.या वेळी आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी मध्यस्थी करून आयआरबीचे आधिकारी यांचेकडून ठोस अश्वासन घेतले होते, की या पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार नाही; पण पुलाचे काम पूर्ण न होता. या ठिकाणी बोगद्यात वाहने जाण्याचा रस्ताही पूर्ण झाला नसताना अचानक पुलातील रस्त्याची जा ये करणा-या वाहणांची वाहतूक बंद केली , असल्याने वाहनचालकांना फार मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!