आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

जिल्हा परिषद शाळेत सर्पदंशाने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू.

बावधन येथील जिल्हा परिषद शाळेत सर्पदंशाने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पद्मा मारूती केदारी (वय-५१,रा-औढोली ,ता-मावळ) असे सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

Spread the love

जिल्हा परिषद शाळेत सर्पदंशाने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू.

आवाज न्यूज, लोणावळा (प्रतिनिधी ) २७ नोव्हेंबर.

बावधन येथील जिल्हा परिषद शाळेत सर्पदंशाने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.पद्मा मारूती केदारी (वय-५१,रा-औढोली ,ता-मावळ) असे सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.ता.१९ रोजी दुपारच्या वेळी जेवणाचा डबा खाण्यास बसण्यासाठी हात स्वच्छ धुताना भिंतीच्या खिडकीतून बाहेर हात धुताना तिथे दगडगोटे असलेल्या ढिगा-यात विषारी सापाने दंश केला.पुन्हा हात बाहेर घेतला असता ,दोन्हीही बोटांना सर्पदंशाने जखम झाल्यानंतर पाहिले असता, त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्येत सुधारत असताना ससून रूग्णालयात ता.२० रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी राञी दहा वाजता आचानक तब्येत बिघडल्याने पद्मा केदारी यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय आधिकारी यांनी ससून रूग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

कै.पद्मा केदारी यांचे पार्थिवावर ता.२१ रोजी सकाळी औढोली येथील स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना बावधन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक , तसेच विविध मान्यवरांचेवतीने तसेच औढोलीतील माजी उपसरपंच नंदूभाऊ विश्वासराव यांचेकडून श्रध्दांजली वाहण्यात आली. या आकस्मिक घटनेमुळे पंचक्रोशित हळहळ व्यक्त होत आहे.अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू असलेल्या कै.पद्माताई केदारी यांनी प्रारंभी कुसगाव बुद्रूक येथील शाळेत मुलांना घडविण्याचे कार्य केले. काही वर्षे कुणेनामा येथील शाळेवर तसेच तालुक्याबाहेरही शिकविण्याचे काम केले आहे.
बावधन या शाळेत सध्या त्या शिकवीत होत्या.
कै.पद्मा मारूती केदारी यांचे पश्चात सेवानिवृत्त नौदल अधिकारी व पुणे विद्यापीठात सुरक्षा विभागप्रमुख मारूती सूर्यकांत केदारी , एक मेकानिकल इंजिनियर मुलगा , एक एमबीबीएस शिक्षण घेतलेली कन्या , सासू , सासरे , माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल केदारी व कार्यकर्ते सुनिल केदारी हे दोन दीर व जावा , आणि त्यांची मुले असा परिवार आहे.पंढरीचे अनेक वर्षे पायी वारकरी ह.भ.प.सूर्यकांत मारूती केदारी यांच्या त्या स्नुषा होत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!