आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध उपक्रमांनी प्रतिभा महाविद्यालयात संविधान दिन साजरा..

संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून “मला समजलेले संविधान” या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..

Spread the love

विविध उपक्रमांनी प्रतिभा महाविद्यालयात संविधान दिन साजरा..

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार, चिंचवड प्रतिनिधी २९ नोव्हेंबर ः

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक डॉ. दिपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे आदी मान्यवरांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून “मला समजलेले संविधान” या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाची वैशिष्ट्ये, कलमे, मार्गदर्शक तत्त्वे, सरनामा, प्रतिज्ञा, सामान्य नागरिकांचे मुलभूत हक्क, गणराज्य, धर्मनिरपेक्ष राज्य आदी माहिती विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतामध्ये सविस्तरपणे विशद केली.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘मला समजलेले संविधान’ या विषयावर निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनुक्रमे प्रथम. श्रेयश दोडेकर ,द्वितीय. मानसी भेगडे, तृतीय. मिथूसा पाटील विजयी झाले, त्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली वाघमारे, ईरीक डायस यांनी केले., आभार प्रा. अश्लेषा देवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वर्षा ठाकरे, प्रा. श्रद्धा भिलारे, प्रा. गुरूनाथ विद्यार्थी अनिकेत शिंदे, अथर्व दिघे, श्वेता वर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने देशभक्तीपर गीत, संविधान प्रास्ताविका वाचन, जनजागृती भित्तीपत्रके आदी उपक्रम राबविण्यात आले. भारतीय संविधानाचे पुजन विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गायकवाड म्हणाल्या, तुम्ही भावी शिक्षक, शिक्षिका होणार आहात. संविधान घरोघरी पोहचवावा आपल्या संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी नामदे, यांनी केले, प्रस्तावना सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख पल्लवी चव्हाण यांनी तर, आभार स्वाती बोचरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!