आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या१३२ व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले स्मारक पुणे येथे मनसे तर्फे अभिवादन करण्यात आले ..

महात्मा फुले लाँगरहॅन्समधील समाजसुधारणेच्या चळवळीतील सर्वात महत्वाचा घटक मानले जातात.

Spread the love

महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या१३२ व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले स्मारक पुणे येथे मनसे तर्फे अभिवादन करण्यात आले ..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर.

महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. अस्पृश्यतेचा पडदा त्यांनी काढून टाकला आणि समाजाला एक नवीन विचारधारा दिली. शिक्षणामध्ये समाजाला सक्षम बनवायचे असेल तर महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे, असा फुले यांचा विश्वास होता.

त्यानंतर, मुलींच्या शिक्षणासाठी फुले यांनी पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी १८४८. मध्ये भारतात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी पत्नी सावित्रीबाईंना शाळेत शिकवण्यास प्रेरित केले. जाती-अस्पृश्यता दूर करून शिक्षण घेण्यासाठी त्यांनी निम्न-स्तरीय मुलींना प्रेरित केले.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्य-शोध संस्थेची स्थापना केली (सत्यशोधक समाज). त्यानुसार निम्न जातींनी लोकांचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्पीडित जाती व वर्ग यांच्या उन्नतीसाठी काम केले गेले.

महात्मा फुले लाँगरहॅन्समधील समाजसुधारणेच्या चळवळीतील सर्वात महत्वाचा घटक मानले जातात.

देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे , क्रूर सती प्रथा रोखणारे ,विधवा स्त्रियांना आसरा देणारे, सत्यशोधक समाजाचे
संस्थापक. व थोर विचारवंत क्रांतिसूर्य.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या१३२ व्या पुण्यथिती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना,कसबा विभागातर्फे महात्मा फुले स्मारक येथे   अभिवादन करण्यात आले याप्रसंगी, प्रल्हाद भाऊ गवळी,  गणेश भोकरे, निलेश हांडे, रवि सहाणे, वसंत खुटवड, संग्राम तळेकर, साईनाथ चकोर, प्रवीण क्षीरसागर, विशाल ओदेल व सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

त्या प्रसंगी हिंगणे खुर्द येथील महापालिका शाळेतील लहान मुली, अर्थात छोट्या सावित्री व त्यांच्या शिक्षिका. राखी रासकर या ही उपस्थित होत्या यासर्वांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त “फुले गौरव गीत” गायले, यावेळी  उपस्थित सर्व मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!