आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पुण्यातील पत्रकार परिषदेमधून चंद्रशेखर आझाद यांचा हल्लाबोल..

Spread the love

पुण्यातील पत्रकार परिषदेमधून चंद्रशेखर आझाद यांचा हल्लाबोल..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी,२९ नोव्हेंबर.

आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.चंद्रशेखर आझाद (रावण) यांचा पुणे दौरा (दि.२८)नुकताच पार पडला.यावेळी महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष ॲड तौसिफ शेख यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पक्षाकडून भूमिका मांडण्यात आली होती.

राज्यात सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर होत असलेल्या बेताल वक्तव्याचा ॲड आझाद यांनी चांगलाच समाचार घेतला.वि.दा.सावरकर यांच्याबाबत होणाऱ्या वक्तव्याबाबत ‘सावरकर यांची काराकिर्द आपणा सर्वांना परिचित आहे.त्याबाबत अजून मी काय बोलणार’म्हणत मिश्किल टिप्पणीही केली.देशात अल्पसंख्यांकांमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.त्याबाबत आपण जागरूक राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र लीगल सेल चे अध्यक्ष तौसिफ शेख,महासचिव क्रांती सहाणे,शाबीरभाई सय्यद(महाराष्ट्र कोअर कमिटी),दीपक गायकवाड(प.महाराष्ट्र लीगल सेल अध्यक्ष),स्वप्निल गिरमे(पुणे जिल्हाध्यक्ष,लीगल सेल)आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!