ताज्या घडामोडी

सांगली अर्बन को ऑफ बँक लि. सांगली चे कर्मचारी श्री. रमेश पाटील यांचा सेवा निवृत्ती झाल्याबद्दल शाखाधिकारी श्री. जे. आर. पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न

Spread the love

कासेगाव ता. वाळवा येथील श्री. रमेश दत्तात्रय पाटील हे सांगली अर्बन को ऑफ बँकेमध्ये सलग 34 वर्ष पूर्ण सर्व्हिस झाली करून आज सेवा निवृत्त झाले या त्यांच्या सेवा निवृत्ती झाल्याबद्दल इस्लामपूर शाखेतील शाखाधिकारी श्री. जे.आर. पाटील यांच्या शुभहस्ते शाल, फेटा, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. रमेश पाटील यांनी सलग ३४ वर्षे बँकेची सेवा करत असताना अतिशय जिद्दीने जिव्हाळ्याने व निष्ठेने सेवा केली आहे. सांगली येथील मुख्य शाखेत पाच वर्ष, हेड ऑफिस सांगली दोन वर्ष, भिलवडी येथील शाखेत पाच वर्ष, रामानंदनगर शाखेत एक वर्षे, परभणी येथील विभागीय कार्यालय तीन वर्ष अशी सेवा अत्यंत प्रामाणिक केली आहे. सेवा निवृत्ती सत्कार प्रसंगी सुरेश कुंभार, रोहित पाटील, मयुर वासूलकर, अपूर्वा वझे, स्नेहा कुलकर्णी, रूपाली पाटील, ओंकार वडे, इस्लामपूर शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री. प्रतापराव पाटील यांनी केले व शेवटी आभार श्री. अरूण विरकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!