आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

इंडियन मेडिकल असोसिएशन तळेगाव दाभाडे शाखेने एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Spread the love

 रविवार दिनांक 29 मे रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन तळेगाव दाभाडे शाखेने एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
“एक शाम- तळेगाव आय एम ए के नाम” होय मित्रांनो 1976 यावर्षी स्थापन झालेली इंडियन मेडिकल असोसिएशन तळेगाव दाभाडेची शाखा गेले 46 वर्ष विविध शिबिरांच्या माध्यमातून रुग्णसेवेत कार्यरत आहे! त्यात खासकरून नेत्र रूग्ण- स्तन आणि गर्भाशयाचे कॅन्सर ग्रस्त रुग्ण- टॉन्सिल शस्त्रक्रिया शिबिर- उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग यावरील तज्ञांचे मार्गदर्शन! वैद्यकीय व्यवसायातील श्रद्धा अंधश्रद्धा- समज गैरसमज याविषयीची व्याख्यानं अशा विविध वैद्यकीय प्रकल्पातून सक्रीय आहे! 1976 यावर्षी माननीय *यशवंतराव चव्हाण* हे तळेगाव नगरपरिषदेच्या उद्घाटनासाठी आलेत त्याच दिवशी महाराष्ट्र *राज्य पातळीवर आय एम ए तळेगाव शाखेने एक वैद्यकीय परिषद*{ कॉन्फरन्स} तळेगाव दाभाडे येथील आयोजित केली होती! त्या परिषदेचे उद्घघाटन माननीय *यशवंतराव चव्हाण* यांच्या शुभहस्ते झाले होते! त्यावेळी परिषदेचे अध्यक्ष म्हणून *डॉक्टर सुभाष खंडकर* आणि डॉक्टर *शाळीग्राम भंडारी* यांनी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती! अशी उज्वल परंपरा असलेल्या या आय एम ए शाखेच्या अध्यक्षाची धुरा सुप्रसिद्ध फिजिशियन कै डॉक्टर *दिलीप भोगे* यांनी स्वीकारली! त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली डॉक्टर *दत्तात्रय गोपाळघरे* डॉक्टर *अमित कुलकर्णी* डॉक्टर *सुदाम खेडकर* अशा नवीन तरुण डॉक्टरांच्या सहकार्यातून तळेगाव आयएमएने अनेक वैद्यकीय परिषदा यशस्वी यशस्वीपणे पार पडल्यात! त्यातून सहाजिकच अत्याधुनिक वैद्यकीय ज्ञानाची भर परिसरातील डॉक्टरांच्या पदरी पडली! हे सर्व करीत असतानाच क्रिकेट स्पर्धा- विविध सहलीतून मनोरंजन असे कार्यक्रम होतच होते! पण गेली सहा वर्षे सातत्याने सक्रिय असलेले आय एम ए चे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर *दत्तात्रेय गोपाळघरे-* सेक्रेटरी डॉक्टर *निलेश नारखेडे*- डॉक्टर *सचिन विटनोर*- लेडी डॉक्टर प्रतिनिधी डॉक्टर *प्रिया किरमानी* आणि डॉक्टर *अमित कुलकर्णी* यां टीमने ऐसी सभासद असलेल्या या शाखेचे या वर्षी प्रथमच- चित्रकला -नृत्य संगीत आणि गायन कलेच्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील रिक्रिएशन हॉल येथे रविवार दिनांक 29 मे रोजी संपन्न केले! अध्यक्ष या नात्याने डॉक्टर *दत्तात्रय गोपाळघरे* यांनी सर्वांचं स्वागत केल्यानंतर- ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर *अशोक निकम* सर- जेष्ठ डॉक्टर *शाळीग्राम भंडारी*- डॉक्टर *कामत* आणि संयोजक टीम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली! आय एम ए च्या कुटुंबातील पाच वर्षापासून तर 65 वर्षे वयाच्या विविध कलाकारांनी भाग घेतला! अतिशय उत्स्फूर्त उत्साहवर्धक विविध नृत्य आणि गाण्याच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला! सहभागी कलाकार यांचं कौतुक करताना कलापिनी संस्थेचे सर्वेसर्वा डॉक्टर *अनंत परांजपे* यांनी संपूर्ण संयोजन कमिटीच मनापासून कौतुक करताना आपली प्रतिभा सातत्याने अशीच जागृत ठेवावी असा सल्लाही दिला! ज्येष्ठ साहित्यिक_- वक्ते डॉक्टर *शाळीग्राम भंडारी* यांनी तळेगाव आय एम ए शाखेच्या इतिहासातील हा पहिलाच संस्कृतिक कार्यक्रम अत्यंत यशस्वी केल्याबद्दल सर्व संयोजक डॉक्टरांच मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं! त्याचबरोबर नवोदित कलाकारांना रंगमंचावर” काईक वाचिक अभिनय”– किती सहजरित्या सादर करावा याचा वस्तुपाठच दिला! डॉक्टर *अनिश भट* आणि डॉक्टर *प्रिया किरमाणी* यांच्या उत्तम सूत्रसंचाल नाने कार्यक्रमाची उंची वाढली! तळेगाव स्टेशनस्थित- उमंग मेडिकल व डॉक्टर डांगे डायग्नोस्टिक सेंटर यांनी या समारंभाच यजमानपद स्वीकारलं होतं! डॉक्टर दत्तात्रय गोपाळघरे यांनी सर्व उपस्थित तसेच सहभागी आणि संयोजक सहकारी यांचे मनापासून आभार मानले! त्यानंतर सुग्रास भोजनाने समारंभाची सांगता झाली!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!