ताज्या घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Spread the love

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गरीब व गरजूंना जेवण ,चहा ,नाष्टा ,बिस्कीट, पाणी वाटप

मुंबई : चर्चगेट येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक येथे २९७ व्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवींना अनेक मान्यवरांनी माल्यार्पण अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कोरोना संकटामुळे देशात गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ लाॅकडाऊन सुरू असून या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून यामुळे‌ अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे काही सामाजिक संस्था अशा लोकांना अन्नवाटप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून याद्वारे ते आपापल्यापरिने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशातच राजमाता अहिल्यादेवी जयंतीनिमित्त युवा नगरसेवक आकाश राज पुरोहित, अडव्होकेट अमित शिंदे, पत्रकार जनार्दन येडगे, राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश येडगे, भारूडकार अनिल केंगार महाराज यांच्या वतीने गरीब व गरजूंना तसेच पोलिसांना खिचडी,पाणी, थंड पेय, बिस्किट ,चहा ,नाष्टा वाटप केले.

यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर, भाजपा प्रवक्ते गणेशदादा हाके,भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार रमेश शेंडगे, महाराष्ट्र राज्य धनगर समजन्नोती मंडळ मुंबई प्रदेश अध्यक्ष शांताराम दिघे, विजयाताई बावदाने, दिलीप मोहिते, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आघाडी किसन चोपडे, नगरसेविका सुजाता सानप, आजी नगरसेवक गणेश सानप,मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, डोंगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे,वैद्यकीय आघाडी मुंबई संयोजक भाजपा डॉ. स्मिता काळे-बंडगर ,शिक्षक आघाडी मुंबई संयोजक भाजपा डॉ.राजू बंडगर ,मुंबई सचिव नीहीरीका खोंदले , आनंद कुऱ्हाडे,युवा मोर्चा दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सन्नी सानप ,शुभांगी कारंडे ,विद्यापीठ सुरक्षा रक्षक अर्जून मुंतुडे आदी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!